• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पावसाळ्यात टाळायचाय डासांचा त्रास? ‘या’ सोप्या पद्धतीने करा स्वत:चं संरक्षण

August 5, 2026 by admin Leave a Comment


देशभरातील अनेक राज्यांमध्ये पाऊस जोरदार पडत आहे. तर एकीकडे पावसामुळे हवामान आल्हाददायक होत असले तरी दुसरीकडे याच ऋतूत अनेक आजार होत असतात. अशातच पावसाळा सुरू होताच डासांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होते. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचते, ज्यामुळे ती जागा डासांच्या प्रजननासाठी पोषक ठरते. खबरदारी न घेतल्यास डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

डासांच्या चाव्यांमुळे डेंग्यू , मलेरिया, चिकुनगुनिया, झिका विषाणू आणि वेस्ट नाईल विषाणू यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. यापैकी काही आजार गंभीर असू शकतात आणि वेळेवर उपचार न केल्यास समस्या अधिक गंभीर होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात डासांपासून बचाव करण्याच्या योग्य पद्धती जाणून घेणे आणि त्यांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण पावसाळ्यात डांसापासून संरक्षण करण्यासाठी काय करावे, कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये हे जाणून घेऊयात.

पावसाळ्यात डासांपासून बचाव करण्यासाठी काय करावे ?

अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC) मते , डासांपासून संरक्षण करण्यासाठी लांब बाह्यांचे कपडे आणि संपूर्ण शरीर झाकणारे कपडे परिधान करा,.

घराबाहेर असताना डास प्रतिबंधक क्रिम लावा आणि त्याच्या वापरासाठीच्या नियमांचे पालन करा. डासांना आत येण्यापासून रोखण्यासाठी खिडक्या आणि दारांना जाळी लावा. जाळी उपलब्ध नसल्यास, मच्छरदाणीचा वापर करा.

भांडी, कुलर, बादल्या, टायर आणि घरातील इतर ठिकाणी पाणी साचू देऊ नका, कारण ही डासांच्या प्रजननाची प्रमुख ठिकाणे आहेत.

घराच्या बाहेर बसताना अशी जागा निवडा जिथे डासांचा त्रास होण्याची शक्यता कमी असेल. साधी खबरदारी घेतल्यास डासांच्या चाव्याचा आणि त्यांच्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.

कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?

डास चावल्यानंतर काही दिवसांत तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी किंवा सांधेदुखी, डोळ्यांमागे वेदना, तीव्र अशक्तपणा, उलट्या, मळमळ किंवा त्वचेवर पुरळ यांसारखी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. काही लोकांना सतत तीव्र ताप किंवा प्रचंड थकवा देखील जाणवू शकतो.

अशी लक्षणे डेंग्यू, चिकुनगुनिया किंवा मलेरियासारख्या आजारांचे संकेत असू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील, तर विनाविलंब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक असल्यास तपासणी करून घ्या.

डासांबाबत अधिक काळजी घेण्याची गरज कोणाला ?

लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांनी डासांपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, मधुमेह, मूत्रपिंडाचा आजार किंवा इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी देखील प्रतिबंधाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

या व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते आणि आजार अधिक गंभीर होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात डासांपासून संरक्षणासाठी सर्व आवश्यक उपाय योजना करा आणि कोणतीही असामान्य लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in