
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा कसोटी सामना बर्मिंघममध्ये होणार आहे. या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन याची पहिली विकेट खास असणार आहे. ही विकेट घेण्याआधीच जसप्रीत बुमराहची आठवण काढली जात आहे. (Photo: PTI)
जसप्रीत बुमराहचा आणि ओली रॉबिन्सनच्या पहिल्या विकेटचा काय संबंध? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. पाकिस्तानविरुद्ध पहिली विकेट घेताच ओली रॉबिन्सनच्या कसोटीत 100 विकेट पूर्ण होतील. यासह कसोटीत 20 पेक्षा कमी सरासरीने 100 विकेट घेणारा जगातील चौथा आणि इंग्लंडचा तिसरा वेगवान गोलंदाज ठरेल. शेवटचं जसप्रीत बुमराहने असं केलं होतं. (Photo: PTI)
जसप्रीत बुमराहच्या नावावर आता 234 कसोटी विकेट आहे. 52 सामन्यात 19.79 च्या सरासरीने या विकेट काढल्या आहेत. म्हणजेच बुमराहने कसोटी 100 आणि 200 विकेटचा टप्पा गाठताना 20पेक्षा कमीची सरासरी ठेवली होती. (Photo: PTI)
ओली रॉबिन्सनने आतापर्यंत 23 कसोटी सामन्यात 19.53 च्या सरासरीने 99 विकेट घेतल्या आहे. म्हणजेच पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात 100 वी विकेट आरामात काढेल. यामुळे 20 पेक्षा कमीच्या सरासरीने विकेट घेण्याचा मान मिळेल. (Photo: PTI)
कसोटी क्रिकेटमध्ये रॉबिन्सनपूर्वी ज्या वेगवान गोलंदाजांनी 100 विकेट काढल्या, त्यांची सरासरी 20 पेक्षा कमी आहे. यात इयान बॉथम आणि जॉर्ज लोहमन यांची नाव आहेत. (Photo: PTI)




Leave a Reply