• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पांडवकडा धबधब्यावर भयंकर घडलं, दोन तरूण चोरवाटेने गेले अन्…भर पावसात धक्कादायक घटना!

July 4, 2026 by admin Leave a Comment


राज्याच्या काही भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी अपघातदेखील घडताना पहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत, तर काही ठिकाणी भिंत कोसळल्याच्याही घटना समोर आलेल्या आहेत. अशातच आता पनवेलमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन तरूण पांडवकडा धबधब्यात वाहून गेल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दोन मुले गेली वाहून

खारघर मधील पांडवकडा धबधब्यावर दोन मुलं चोरवाटेने गेली होती, आता ही मुले वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. याती एक मुलगा 19 वर्षाचा तर दुसरा 20 वर्षांचा आहे. सध्या खारघर अग्निशमन दल या मुलांचा शोध घेत आहेत, मात्र अंधार असल्याने आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सध्या शोध मोहीम थांवण्यात आली आहे. पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी घातलेली आहे मात्र तरी देखील ही मुलं चोर वाटेने गेली होती त्यातील दोन मुले वाहून गेली आहेत. यातील एक मुलगा मुबंईचा तर दुसरा नवी मुबंईचा असल्याची माहिती समोर आली आहे.

नालासोपाऱ्यात एका व्यक्तीचा मृत्यू

नालासोपारा पूर्व येथील जीवन नगर परिसरात पुराच्या पाण्यात वाहत आलेला एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख पटली नसून ओळख पटविण्याचा काम सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना पाण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

पुणे जिल्ह्यात दरड कोसळली

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोन ठिकाणी दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एक घटना जुन्नर तालुक्यातील इंगळून घाटात झाली. दरड आणि माती रस्त्यावर आल्यानं दुपारपासून वाहतूक मंदावली आहे. दुसरी घटना ही लोणावळा लगत कातळ धबधब्याशेजारच्या मार्गावर घडली. ही दरड जेसीबीद्वारे हटवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून कोकण, मुंबई उपनगर आणि घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यामुळे या भागातील नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • केतन अग्रवालच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन
  • IND vs ENG, 2nd T20: इंग्लंडने भारताला 4 गडी राखून नमवलं, मालिकेत 1-0 ने आघाडी
  • Shraddha Kapoor : टायटलचा वाद मिटला, आता ‘ईठा’ चित्रपट रिलीज होण्याआधी श्रद्धा कपूर एक महत्वाचं काम करणार
  • मोठी बातमी! पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी खळबळ
  • जेवणानंतर लिंबू-आल्याचे पेय पिणे ठरू शकते फायदेशीर? जाणून घ्या पचन सुधारण्याचे नैसर्गिक रहस्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in