• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पहिला पगार होताच कुठे लावावा पैसा ? FD, RD वा SIP बेस्ट काय ?

August 8, 2026 by admin Leave a Comment


FD vs RD vs SIP: नोकरीची पहिली कमाई ही केवळ एक सॅलरी नव्हे तर तुमच्या आर्थिक प्रवासाची सुरुवात आहे. हा तोच काळ आहे जेव्हा तुमच्या छोट्या – छोट्या निर्णयाचा परिणाम भविष्याच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होऊ शकतो. परंतू अनेकजण पहिला पगार हातात पडताच शॉपिंग, फिरणे आणि अन्य मौजमजेसाठी हा पैसा खर्च करतात. तज्ज्ञांच्या मते जर आयुष्याला पहिल्या पगारापासून आर्थिक शिस्त लावली तर दीर्घकाळात मोठा फंड तयार केला जाऊ शकतो.

कोणत्याही गुंतवणूकीची सुरुवात करण्याच्याआधी एक मजबूत इमर्जन्सी फंड तयार करणे खूप गरजेचे असते. यानंतर तुम्ही तुमच्या गरजेच्या नुसार FD, RD वा SIP सारख्या पर्यायांची निवड करु शकता.
सर्वात आधी इमर्जन्सी फंड तयार करा…

गुंतवणूकीच्या आधी किमान ३ ते ६ महिन्यांच्या गरजेच्या खर्चांसाठी एक समान रक्कम वेगळी ठेवणे गरजेचे असते. या पैशाला तुम्ही अशा ठिकाणी ठेवा जेथे कोणत्याही इमर्जन्सी तुम्ही सहज काढू शकता. सर्वसाधारणपणे नोकरी गेल्यास, मेडिकल इमर्जन्सी वा अन्य कोणत्याही आवश्यकतेवेळी हा पैसा तुमच्या खूप कामी येऊ शकतो. कारण इमर्जन्सी फंड या अचानक आलेल्या खर्चांसाठी असतो.

FD, RD वा SIP कोणासाठी चांगला ऑप्शन?

FD के फायदे

जर तुमच्याकडे एक ठराविक रक्कम उपलब्ध आहे. तर तुम्हाला कोणत्याही जोखीमेशिवाय गुंतवणूक करायची असेल फिक्स्ड डिपॉजिट (FD) तुमच्यासाठी चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो.

गुंतवणूकीवर मिळते व्याज…

यात बाजारातील चढ-उताराचा कोणताही परिणाम होत नाही.

कमी जोखीम पसंद करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे

शॉर्ट टर्म लक्ष्य आणि इमर्जन्सी सेव्हींग्ससाठी वापर

RD चे फायदे

रिकरिंग डिपॉझिट (RD) त्या लोकांसाठी फायद्याचे जे दर महिन्याला एक निश्चित रक्कम बचत करु शकतात.

छोट्या रकमेतून गुंतवणूकीची सुरुवात करता येते

नियमित बचतची सवय लागले

यात निश्चित रिटर्न मिळतो

SIP चे फायदे

जर तुमचा हेतू गुंतवणूकीतून भविष्यासाठी एक मोठा फंड तयार करण्याचा आहे. तर तुमच्यासाठी SIP एक चांगला ऑप्शन होऊ शकतो. SIP च्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडात देखील नियमित गुंतवणूक करु शकता.

चक्रवाढ व्याजाचा मिळतो लाभ

दीर्घ अवधीत चांगला परतावा मिळण्याची आशा असते.

यात तुम्ही छोट्या रकमेतून सुरुवात करु शकता.

रिटायरमेंट, घर खरेदी वा मुलांचे शिक्षण या सारख्या मोठ्या लक्ष्यासाठी फायदेशीर

पगार होताच पाळा हा 50:30:20 नियम

50% उत्पन्न गरजेच्या खर्चांवर

30% रक्कम लाईफस्टाइल आणि व्यक्तिगत गरजांसाठी

20% रक्कमेला बचत आणि गुंतवणूकीसाठी

जर तुमच्या खर्चाची जबाबदारी कमी असेल तर तुमच्या वेतनाचा 30% चे 40% भाग तुम्ही गुंतवणूकीसाठी बाजूला काढू शकता.

या चुका करु नका…

गुंतवणूकीची सुरुवात करण्यास उशीर करु नये..

कधीही तुमचा संपूर्ण पगार खर्च करु नका.

इमर्जन्सी फंड जमा करण्याकडे दुर्लक्ष नको.

केवळ जास्त परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकीची सुरुवात करु नका..

मित्रांसोबत मिळून वा सोशल मीडियाच्या ट्रेंड भुलून पैसे लावू नका.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ना दुधाची विक्री, ना पॅकेटचं दूध; भारताच्या या अनोख्या गावाबद्दल माहित्ये का ?
  • ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील अभिनेत्रीचा श्रावणी लूक चर्चेत; हिरव्या साडीतील सौंदर्याने वेधले लक्ष
  • हिंदू की मुस्लिम, भारतात कोणत्या धर्मातील सर्वाधिक महिला नोकरी करतात? आकडा वाचून चकित व्हाल
  • Video: श्रेयस अय्यरसोबत सेल्फी घेताना फॅन काय करून बसला! वैतागणार नाही तर काय करणार?
  • High Court : बायकोला काळी म्हटलं तर शिक्षा होईल का? हायकोर्टाने काय निकाल दिला?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in