• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पहाटे 6 चे शोज, 1 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री; या चित्रपटाची तुफान क्रेझ, ‘धुरंधर 2’चाही मोडणार रेकॉर्ड?

July 17, 2026 by admin Leave a Comment


जगातील टॉपच्या चित्रपट दिग्दर्शकांमध्ये गणल्या जाणाऱ्या ख्रिस्तोफर नोलन यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द ओडिसी’ हा चित्रपट आज (17 जून 2026) जगभरात प्रदर्शित झाला आहे. भारतातही या चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे., कारण स्वत: ख्रिस्तोफर नोलन यांनी चित्रपटातील कलाकारांसोबत भारतात येऊन चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं. नोलन यांच्या मागच्या ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने भारतात 150 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. त्याआधीही त्यांचे चित्रपट भारतात लोकप्रिय ठरले होते. ‘द ओडिसी’ची भारतात जबरदस्त अॅडव्हान्स बुकिंग झाली असून पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ख्रिस्तोफर नोलन यांच्या या चित्रपटासाठी भारतात अत्यंत सकारात्मकरित्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. आयमॅक्स फॉरमॅटमधील तिकिटं सुरुवातीपासूनच अत्यंत जलद गतीने बुक होत आहेत. ‘द ओडिसी’च्या ट्रेलरमध्ये दमदार व्हिज्युअल्स पहायला मिळाले. त्यामुळे मोठ्या पडद्यावर त्याचा अनुभव अत्यंत चांगल्याप्रकारे घेता यावा यासाठी आयमॅक्स फॉरमॅटला प्रेक्षकांकडून सर्वाधिक पसंती मिळतेय. दिल्ली, मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये पहाटे 6 वाजल्यापासूनच ‘द ओडिसी’चे शोज सुरू झाले आहेत. ‘सॅकनिक्ल’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, भारतात फक्त 34 आयमॅक्स स्क्रीन्सवर ‘द ओडिसी’चे तब्बल 91000 हून अधिक तिकिटं विकली गेली आहेत. या बुकिंगमधून 9.5 कोटी रुपयांचं कलेक्शन आधीच झालं आहे.

पहा ट्रेलर-

‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या माहितीनुसार, फक्त ओपनिंग डेलाच म्हणजेच शुक्रवारसाठी ‘द ओडिसी’चे 1.25 लाखांहून अधिक तिकिटं विकली गेली आहेत. म्हणजेच या चित्रपटाचं एकूण कलेक्शन हे दहा कोटी रुपयांहून अधिक होणार असल्याचा अंदाज आहे. अॅडव्हान्स बुकिंग आणि पहिल्या दिवसाची गर्दी हे दोन्ही मिळून ‘द ओडिसी’ची भारतातील ओपनिंग ही 20 कोटी रुपयांहून अधिक झाल्यास नवल वाटण्याचं काही कारण नाही.

2026 मधील सर्वांत मोठ्या बॉलिवूड ओपनिंग्सच्या तुलनेत या आकड्याकडे दुर्लक्ष करता येणार आहे. यावर्षी फक्त दोनच चित्रपट हे पहिल्या दिवशी 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करू शकले. यामध्ये ‘धुरंधर 2’ (90 कोटी रुपये), ‘बॉर्डर 2’ (32 कोटी रुपये) यांचा समावेश आहे. अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ किंवा अजय देवगणचा ‘धमाल 4’, शाहिद कपूरचा ‘कॉकटेल 2’ यांसारखे चित्रपटसुद्धा पहिल्या दिवशी 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करू शकले नाहीत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण…
  • Sania Mirza : थरथरत होती सानिया, घटस्फोटानंतर पॅनिक अटॅक; शूटिंग सोडून पायजमा-चप्पलमध्ये धावली खास मैत्रीण !
  • धडधाकट पुरुष, पण महिला क्रिकेटमध्ये खेळला! असं कसं झालं? ICC ला समजताच काय घडलं?
  • Rakshabandhan 2026 : भावाला राखी बांधण्याची योग्य मुहूर्त कोणता? वेळच सण साजरा करा
  • तू अर्ध्या रात्री आवाज दे, मी एका आवाजावर येईन म्हणाला होतास..; खवड्या डोंगर प्रकरणातील कुणालच्या मावस बहिणीची पोस्ट पाहून डोळ्यात येईल पाणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in