• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पत्नीच्या त्या निर्णयामुळे नवऱ्याचं बदललं नशीब, आज महिन्याला करतोय 60 कोटींची कमाई

September 2, 2026 by admin Leave a Comment


लाखो रुपयांचे पॅकेज असणारे अनेक कर्मचारी आपला जॉब सोडून वेगळं काही तरी करण्याचा प्रयत्न करताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे. नोकरी पेक्षा वेगळा मार्ग निवडून अनेक कर्मचारी आज लाखो रुपयांची कमाई करताना दिसत आहेत. अशीच एक गोष्ट सध्या समोर आली ज्यामध्ये अमेरिकेतील लाखोंचे पॅकेज, Wiproसारख्या दिग्गज कंपनीत तब्बल 12 वर्षे करिअर करून त्यांनी चक्क शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनाशी जोडले जाण्याचा घेतला. मात्र, बंगळुरू विद्यापीठातून बीटेकचे शिक्षण घेतलेल्या शशि कुमार यांनी हा धाडसी निर्णय घेत कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीला रामराम ठोकून त्यांनी भारतात परत येत ‘अक्षय कल्प’ या ऑर्गेनिक डेअरी आणि अॅग्रीटेक व्यवसायाची सुरुवात केली.

शशि कुमार यांचे वडील स्वतः शेतकरी होते. त्यामुळे शेतीतील कष्ट, अडचणी आणि शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांनी जवळून पाहिली होती. शेतकऱ्यांच्या अडचणींनी व्यथित झालेल्या शशि यांनी त्यांचे जीवनमान बदलण्याचा निर्धार केला. मात्र, मुलाने स्थिर नोकरी सोडून शेतीशी संबंधित व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या वडिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इतकेच नाही तर वडिलांनी तब्बल आठ वर्षे मुलाशी संवादही साधला नाही.

नोकरी सोडणे ही केवळ सुरुवात होती. ‘अक्षय कल्प’ उभारताना शशि कुमार यांना प्रचंड आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. सुरुवातीच्या नऊ वर्षांत तब्बल सहा वेळा कंपनी बंद पडण्याची आणि दिवाळखोरीची परिस्थिती निर्माण झाली. एकूण जवळपास 10 वेळा ते पूर्णपणे कोलमडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले. मात्र, त्यांनी हार मानली नाही.

पत्नीच्या त्या निर्णयामुळे मिळालं बळ

या कठीण काळात त्यांच्या पत्नीने मोठा आधार दिला. व्यवसाय वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःची आयुष्यभराची बचत असलेले 30 लाख रुपये शशि कुमार यांच्या स्वाधीन केले. पत्नीच्या या विश्वासामुळे त्यांना पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळाले. त्यानंतर त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेत व्यवसायाला नव्या उंचीवर नेले.

आज त्याच ‘अक्षय कल्प’चा वार्षिक व्यवसाय तब्बल 700 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा केला जात आहे. कंपनी दरमहा सुमारे 60 कोटी रुपयांचा नफा कमावत असल्याचेही या माहितीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाशी आज 2800 हून अधिक शेतकरी थेट जोडले गेले आहेत.

कंपनीकडून प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी दरमहिना 1.28 लाख रुपये दिले जात असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच वर्षभरात शेतकऱ्यांना सुमारे 480 कोटी रुपये मिळत असल्याचा दावा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव आणि स्थिर उत्पन्न मिळवून देण्याच्या मॉडेलमुळे ‘अक्षय कल्प’ची चर्चा होत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shivsena Symbol Dispute : एकनाथ शिंदेंनी पक्षातून बंडखोरी का केली? शिवसेना शिंदे गटाच्या वकिलाचा सुप्रीम कोर्टात थेट मोठा दावा
  • शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंचे वकिल फिरवणार डाव? नेमक्या मुद्यावर युक्तिवाद
  • ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद; थेट निवडणूक आयोग….
  • एसीरुम या वस्तू ठेवण्याची कधीही चूक करु नका, एकदा कारण नक्की घ्या जाणून
  • रवींद्र जडेजा सर जेफरी बॉयकॉट यांचा लाडका! आवडता खेळाडू असण्याचं कारण काय? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in