• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पतीने Kiss केलं तर ठीक, पण अफेअर.. तारक मेहता फेम अभिनेत्रीचं शॉकिंग वक्तव्य

July 4, 2026 by admin Leave a Comment


टीव्ही अभिनेत्री सिम्पल कौल हिने किसिंग आणि इंटिमेट (जिव्हाळ्याच्या) दृश्यांबाबत आपली मते मोकळेपणाने मांडली. तिने सांगितले की, तिच्या पतीला अशी दृश्ये करावी लागली तर तिला काहीच अडचण नाही, परंतु नात्यातील फसवणूक ती कधीही सहन करणार नाही.

आजकाल चित्रपट आणि मालिकांमध्ये चुंबनाचे दृश्य शूट करणं हे खूप सामान्य मानलं जातं. असं असलं तरीही अशा दृश्यांमुळे अनेकदा वाद निर्माण होतात आणि काही वेळा त्यामुळे नातेसंबंधही संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण होते.
आता यावर लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सिंपल कौल हिने इंटिमेट सीन्स आणि किसिंग सीन यावर आपली मतं मांडली आहेत. तिच्या मते, कलाकारांसाठी अशी दृश्ये हा केवळ कामाचा एक भाग असतो. त्यामुळे वैयक्तिक आयुष्याशी त्याचा संबंध जोडला जाऊ नये.

किसिंग सीन करावा लागला तर..

अभिनय हा एक व्यवसाय आहे आणि कथेची जी काही गरज असेल, त्यानुसार कलाकाराला काम करावं लागतं, असं एका न्यूज एजन्सीशी बोलताना सिंपल कौलने सांगितलं. “जर एखादा अभिनेता किसींग सीन किंवा इंटिमेट सीन करत असेल, तर तेव्हा तो फक्त आपलं काम करत असतो. जर माझ्या पतीने किंवा जोडीदाराने व्यावसायिक दृष्टिकोनातून असं एखादं दृश्य साकारलं, तर मला त्याबद्दल काहीच अडचण वाटणार नाही; कारण ते केवळ त्यांचं काम आहे याची मला कल्पना आहे” असं सिंपल म्हणाली.

पण अफेअर चालणार नाही

हा फक्त कामाचा भाग असतो असं तिने स्पष्ट केलं. पण ऑनस्क्रीन इंटिमसी आणि खरं आयुष्य, त्यातील नाती यांच्यात फरक असतो. “जर एखादी व्यक्ती खरोखरच दुसऱ्या कोणासोबत राहण्यासाठी आपल्या नात्याबाहेर पाऊल टाकत असेल, तर ती पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. मी त्या गोष्टीला कधीच योग्य मानणार नाही.” असं ती पुढे म्हणाली. “फसवणूक म्हणजे फसवणूकच; तिला दुसरी कोणतीही व्याख्या नाही. जर दोन व्यक्ती एकमेकांवर प्रेम करत असतील, तर त्यांनी प्रामाणिक आणि निष्ठावान राहिले पाहिजे.” असंही नात्यांमधील विश्वास आणि निष्ठेबद्दल बोलताना सिंपल कौल म्हणाली.

कमिटमेंट नको असेल तर आधीच सांगायचं ना

जर एखाद्याला नात्यात कमिटमेंट नको असेल, तर त्याने ते वेळीच स्पष्ट केलेलं बकं, असं ती म्हणाली. जर नात्यात असताना भावना बदलल्या किंवा नवीन आकर्षण निर्माण झाले, तर ते लपवण्याऐवजी जोडीदाराशी प्रामाणिकपणे बोलले पाहिजे; मात्र, कोणत्याही परिस्थितीत फसवणूक करणे समर्थनीय ठरू शकत नाही, असंही तिने पुढे नमूद केलं.

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सिंपल कौल ही ‘कुटुंब’, ‘शरारत’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘ओये जस्सी’, ‘यम हैं हम’, ‘दिल्ली वाली ठाकूर गुर्ल्स’ आणि ‘जिद्दी दिल माने ना’ यासारख्या अनेक प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये तिने काम केलं होतं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in