• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पतंजलीच्या उत्पादनावर लक्ष ठेवा,अन्यथा…; अभिजीत दीपकेंचा जुना इतिहास काढत इशारा

July 30, 2026 by admin Leave a Comment


कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतरही जोरदार चर्चा होत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे भारताची बदनामी झाल्याचा आरोप बाबा रामदेव यांनी केला. बाबा रामदेव यांनी Gen-Z आंदोलनात शिव्यांची वाखोली वाहण्यात आल्याचाही आरोप केला. बाबा रामदेव यांच्या आरोपांवरून अभिजीत दीपके यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा फोटो बाळगल्याने देशाची आणि संस्कृतीची बदनामी कशी होते, असा सवाल करत दीपकेंनी बाबा रामदेव यांना केला.

अभिजीत दीपके हे बुधवारी छत्रपती संभाजीनगरला पोहोचला. छत्रपती संभाजीनगरला पोहोचल्यानंतर त्याने महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच बाबा रामदेव यांनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं. अभिजीत दीपके म्हणाले, ‘खरंतर पेपरफुटी करून भारत बदनाम झाला आहे. पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन करणे. या आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा फोटो घेऊन आंदोलन करणे. जय भीमची घोषणा देणे यास संस्कृती बदनामी करणे वाटत असेल, तर आम्ही बदनामी करत आहोत’.

काही महिन्यांपूर्वी पतंजलीच्या काही उत्पादनावर बंदी घालण्यात आली होती. त्यावरून टीका करताना दीपके म्हणाले, ‘पतंजलीची उत्पादनामुळे फसवणूक होत असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. त्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत करावेत. संस्कृती, लोकशाही जेन-झी सांभाळून घेऊ शकतो. तुम्ही पतंजलीच्या उत्पादनावर लक्ष ठेवावे, अन्यथा ते बंद पडेल’.

मध्य प्रदेशच्या भोपाळमधील शेतकरी आंदोलनावर दीपके म्हणाले, ‘शेतकऱ्यांची मुलं शिकतात. शेतकरी नेते राकेश टिकैत इत्यादी नेते भेटले. त्यावेळी त्यांच्याशी भेट झाली. त्यावेळी त्यांनी आमच्या मुलांसारखे असल्याचे बोलले. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, आमच्या मुलांना करिअर करायचं आहे. त्यासाठी आंदोलन आहे’. त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांकडून पाठिंबा मिळाला. तो पाठिंबा महत्वाचा होता. जेव्हा शेतकरी नेत्यांना आमची गरज भासेल, तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. जिथे आमची शेतकऱ्यांना गरज पडेल. तिथे आम्ही उभे राहू. मी मूळचा हिंगोलीचा आहे. माझ्या कुटुंबातील काही जण शेती करतात. माझ्या घरचे आयटी कंपनीतून आले नाहीत. किंवा सरकारी कंपन्यांमधून आले नाही. सर्वांची सुरुवात शेतकरी कुटुंबातून झाली आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहू’.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in