
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची करो या मरोची स्थिती आहे. आता भारताच्या दोन कसोटी मालिका शिल्लक आहेत. यात भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. या सातही सामन्यात भारताने विजय मिळवला तर अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. असं असताना न्यूझीलंडविरुद्धचा दौरा खूपच महत्त्वाचा आहे. या दौऱ्यापूर्वी इंडिया ए संघाची चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. इंडिया ए संघ न्यूझीलंडला मल्टी डे सामने खेळण्यासाठी जाणार आहे. यासाठी न्यूझीलंड क्रिकेटने टीम इंडियाचा दौरा आणि प्लंकेट शील्ड देशांतर्गत क्रिकेट सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या दौऱ्यात इंडिया ए संघ न्यूझीलंड ए विरुद्ध तीन 4 दिवसीय सामने खेळणार आहे.
इंडिया ए विरुद्धची मल्टी डे कसोटी सामना 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूची कसोटी संघासाठी विचार होऊ शकतो. कारण भारताचा मुख्य संघ 19 नोव्हेंबर 2026 पासून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे इंडिया ए संघातील खेळाडूंची चाचपणी होणार यात काही शंका नाही. श्रीलंका दौऱ्यापूर्वीही असंच झालं होतं.
इंडिया ए विरुद्ध न्यूझीलंड ए वेळापत्रक
- पहिला 4 दिवसीय सामना, 24 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर (बर्ट सटक्लिफ ओवल, लिंकन)
- दुसरा 4 दिवसीय सामना, 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर (हेगले ओवल, क्राइस्टचर्च)
- तिसरा 4 दिवसीय सामना, 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर (बर्ट सटक्लिफ ओवल, लिंकन)
दुसरीकडे, न्यूझीलंड क्रिकेट इतिहासात भारताचा सर्वात मोठा दौरा असणार आहे. भारताचा मुख्य संघ या दौऱ्यात 5 टी20, 5 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका असणार आहे. 4 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान पाच सामन्यांची वनडे मालिका खेळेल. तर 19 नोव्हेंबर आणि 27 नोव्हेंबरला दोन कसोटी सामने होतील.
2019 नंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये कसोटी खेळणार
भारतीय संघ 2019 नंतर न्यूझीलंड दौऱ्यात कसोटी मालिका खेळणार आहे. तर व्हाईट बॉल क्रिकेटही 2022 नंतर खेळणार आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांची परीक्षा असणार आहे. विदेशी भूमीत आपली क्षमता सिद्ध करण्याची एक संधी असणार आहे.
Leave a Reply