• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नोकरी गमावून बसलात…! काळजी करू नका, ‘या’ मार्गांनी भरता येईल EMI

June 6, 2026 by admin Leave a Comment


मध्यमवर्गीय व्यक्ती स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कायम मेहनत घेत असतो. अशात बँकेतून मिळणाऱ्या कर्जाची त्याला मोठी मदत होते. गृहकर्ज, गाडीचं कर्ज, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज असे अनेक प्रकारचे कर्ज अनेकांच्या खांद्यावर असतात. दर महिन्याला कर्जाची एक ठराविक रक्कम पगारातून जाते. अशात नोकरी गेल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात. ज्यामुळे घरखर्चातर प्रश्न उपस्थित राहतोच, पण कर्जाचे हप्ते भरणं देखील कठीण जातं. अनेक लोकांना आपल्या पगारातून इतके हप्ते भरणं शक्य होत नाही. परंतु योग्य नियोजनाने, कोणताही मोठा आर्थिक भार कमी वेळात सोडवला जाऊ शकतो.

आपत्कालीन निधी असणं आहे महत्त्वाचं

कोणत्याही आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपत्कालीन निधी (Emergency Fund). आपत्कालीन निधी असल्यामुळे तुम्हाला अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यास मदत होऊ शकते. तीन ते सहा महिन्यांचा खर्च भागवण्यासाठी आपत्कालीन निधी बाजूला ठेवला पाहिजे.

समजा तुमचा एकूण मासिक ईएमआय 30 हजार रुपये आहे आणि तुम्हाला इतर खर्चांसाठ 20 हजार रुपयांची गरज आहे. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे तीन महिन्यांसाठी सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांचा आपत्कालीन निधी असायला हवा. आपत्कालीन निधी असल्यामुळे तुम्हाला आर्थिक तणावाशिवाय नोकरी शोधण्यास मदत होईल.

बँकेशी बोलून घ्या

नोकरी गमावल्यानंतर, तुम्ही तुमच्या बँकेशी कर्ज स्थगिती (मोरेटोरियम), कर्ज पुनर्रचना आणि व्याज कपात याबद्दल बोलू शकता. जर कर्ज स्थगिती मंजूर झाली, तर तुम्हाला काही काळासाठी ईएमआय भरावे लागणार नाहीत. पण व्याज वाढेल. कर्जाचा कालावधी वाढवल्यानेही तात्पुरता दिलासा मिळेल, पण त्याचा एकूण व्याज परतफेडीवर नकारात्मक परिणाम होईल.

तुम्ही व्याजदरात कपात करण्यासाठी अर्जही करू शकता. जेव्हा तुम्ही कर्जाचा कालावधी वाढवता, तेव्हा व्याज आणि परतफेडीची रक्कम नैसर्गिकरित्या वाढते, त्यामुळे असा निर्णय केवळ विचार करुनच घेतला पाहिजे. काही बँका आणि वित्तीय संस्था अशा सवलती देण्यास तयार नसतात.
जर तुमच्याकडे आपत्कालीन निधी नसेल किंवा बँकेकडून अनुकूल मदत मिळत नसेल, तर तुम्ही तुमची मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभारू शकता. सोन्यासारखी मालमत्ता जमा करून तुम्ही कमी व्याजदराने पैसे मिळवू शकता. याशिवाय, तुम्ही शेअर्स आणि म्युच्युअल फंडांसारख्या प्रतिभूती गहाण ठेवूनही कर्ज घेऊ शकता. कमी व्याजदराने कर्ज मिळवण्याच्या मार्गांचा विचार करणं नेहमीच चांगलं असतं.

गृहकर्ज घेण्यापूर्वी, प्रत्येकाच्या व्याजदरांची तुलना करणं उचित ठरतं. ज्याचा व्याजदर सर्वात कमी असेल, तो तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असेल. सुवर्ण कर्जाचे व्याजदर सामान्यतः इतर प्रकारच्या कर्जांपेक्षा कमी असतात.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in