
नेपाळमध्ये ग्लेशियर कोसळून बुधवारी आलेल्या महापुराने आतापर्यंत 768 जणांचा बळी घेतला आहे.आतापर्यंत सुरक्षा दलांनी पाच हजार जणांना रेस्क्यू केले आहे. या पुरातील मृतदेहांना जतन करण्याचे अवघड शिवधनुष्य नेपाळला पेलावे लागत आहे. या महापुरात नेपाळच्या हायड्रोपॉवरचे 900 हून अधिक कर्मचारी बेपत्ता असल्याचे वृत्त काल आले होते. हे कर्मचारी टनेलमध्ये अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी या टनेलच्या वरच्या भागात ड्रीलिंगने होल करुन ऑक्सिजन आणि अन्न पाकिटे पुरवले जात आहे. या टनेलच्या प्रवेशमार्गातील चिखळ आणि गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply