• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धक्कादायक! 270 प्रवासी असणारी बोट उलटली, अंगावर काटा आणणारा Video समोर

August 30, 2026 by admin Leave a Comment


सायप्रसमधून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. नॉर्थ सायप्रसच्या किनाऱ्यावरून निघाल्यानंतर काही वेळातच 270 प्रवाशांना घेऊन जाणारी पॅसेंजर बोट उलटली. रॉयटर्सने सायप्रसमधील माध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत जीवितहानी झाली आहे की नाही, याची माहिती स्पष्ट झालेली नाही. मात्र, घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

किनाऱ्यापासून सुमारे चार मैल अंतरावर घटना

असोसिएटेड प्रेसच्या माहितीनुसार, कॅटामरन प्रकारची ही बोट सायप्रसच्या उत्तर भागातील कायरिनिया बंदरातून तुर्कीतील मेर्सिन प्रांतातील तासुकू बंदराकडे जात होती. किनाऱ्यापासून सुमारे चार मैल अंतरावर असताना फेरीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आणि काही काळातच बोट बुडाली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.

बचावकार्य सुरू

दरम्यान, AFP च्या वृत्तानुसार, नॉर्थ सायप्रसच्या तुर्की प्रशासनाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, बचाव आणि आरोग्य सेवांकडून तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. नॉर्थ सायप्रसचे वाहतूक मंत्री एरहान अरिकली यांनी तुर्कीच्या सरकारी TRT वृत्तवाहिनीशी बोलताना फेरी उलटल्याची माहिती दिली. बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

🚨 BREAKING: Passenger ferry sinking off the coast of Northern Cyprus

There are 279 people on board. Turkish media report that some passengers have been injured.

People are awaiting rescue on the overturned ferry, which was heading to the Turkish port of Taşucu 🇹🇷

Coast guard… pic.twitter.com/XwgpXiga9q

— NEXTA (@nexta_tv) August 30, 2026

बोट बुडण्याचे कारण अस्पष्ट

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, आतापर्यंत 100 हून अधिक प्रवाशांची सुटका करण्यात आली असून त्यांना कायरिनिया येथे आणण्यात आले आहे. मात्र, फेरीमध्ये नेमक्या कोणत्या कारणामुळे पाणी शिरले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, कायरिनिया आणि तासुकू या मार्गावर अनेक कंपन्या नियमितपणे फेरी सेवा चालवतात. मात्र, उलटलेली फेरी नेमकी कोणत्या कंपनीची होती, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

ट्युनिशियामध्येही बोट बुडाली

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये बुडणाऱ्या जहाजाच्या आसपास समुद्राच्या पाण्यात लाइफ जॅकेट घातलेले काही लोक पोहताना दिसत आहेत. या घटनेशी संबंधित बचावकार्य सुरू असतानाच ट्युनिशियामधूनही एक दुर्घटना समोर आली आहे. दक्षिण ट्युनिशियाच्या किनाऱ्याजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट उलटली. या दुर्घटनेत किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून 12 जण बेपत्ता आहेत. तर एका व्यक्तीला सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो… महायुतीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली खदखद
  • केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
  • Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
  • Chanakya Niti : आयुष्यात या तीन चुका कधीच करू नका, येईल पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?
  • घरच्या घरी पिस्त्याचे झाड लावायचंय? फक्त ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in