• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नेपाळचा भारताला मोठा दणका! थेट बंदी, भारत मित्र मित्र करत बसला तिकडे थेट..

June 9, 2026 by admin Leave a Comment


भारत नेपाळसोबत संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, नेपाळ शेजारी काही देशांच्या नादी लागून भारताविरोधात भूमिका घेत आहे. त्यामुळे दोन्ही देशात पूर्वीसारखे चांगले संबंध दिसत नाहीत. त्यामध्येच आता भारताला मोठा दणका देत नेपाळने भारताच्या आंब्यासोबतच काही फळांवर नेपाळमध्ये बंदी घालती आहे. भारतीय फळांवर नेपाळमध्ये बंदी घातल्याने नेपाळच्या शहरांमध्ये फळांचे भाव वाढले. फळ व्यापाऱ्यांवर थेट परिणाम होत आहे. राइजिंग नेपाळ डेलीच्या रिपोर्टनुसार, नेपाळमध्ये भारतीय आंब्याची मोठी मागणी आहे. नेपाळी लोकांना भारतीय आंबे प्रचंड आवडतात. नेपाळमध्ये आंब्याचे उत्पादन म्हणावे तेवढे होत नाही. त्यामध्ये व्यापारी आंब्यांची मागणी पुरवण्याकरिता भारताकडून मोठ्या प्रमाणात आंबे खरेदी करतात. मात्र, अचानक भारतीय आंब्यांवर बंदी घातल्याने त्याचा मोठा परिणाम मार्केटमध्ये बघायला मिळतोय.

अचानक बंदी घातल्याने मोठी समस्या निर्माण झाली. नेपाळी आंब्यांचा हंगाम फक्त दोन महिन्यांचा असतो. त्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात भारतातून आंब्यांची आयात करतात. भारतातून आंब्यांच्या कमतरतेमुळे स्थानिक पातळीवर उत्पादित आंब्यांची टंचाई निर्माण झाली झाली. यासोबतच भावही गगणाला पोहोचले आहेत. फक्त भारतीय आंबेच नाही तर इतरही काही भारतातून जाणाऱ्या फळांवर नेपाळी सरकारने बंदी घातली आहे.

यादरम्यानच नेपाळच्या व्यापाऱ्यांनी सरकारला मोठा इशारा देत म्हटले की, जर सरकारने ही बंदी उठवली नाही तर ग्राहकांना थेट किमत मोजावी लागेल आणि फळांचे भाव अधिक वाढतील. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये सध्या सर्वच फळांच्या किमती वाढल्या आहेत. भारताच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात नेपाळ सरकार बंदी घालताना दिसत आहे.

भारताबद्दल विविध दावेही नेपाळ सरकारकडून केली जात आहे. नेपाळचे विदेश मंत्री भारताच्या दाैऱ्यावर होते. भारत नेपाळसोबत व्यवस्थित संबंध ठेवत आहे. समोरून चांगले संबंध नेपाळ ठेवत आहे. मात्र, मागून भारताच्या विरोधात काड्या करण्याचे काम नेपाळचे सुरू आहे. आता भारतीय फळावर नेपाळमध्ये बंदी घातल्याने तणाव वाढू शकतो. यावर भारत नक्की काय भूमिका घेतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कार 8 लाखांची, पण बिल 10 लाखांचे? जाणून घ्या एक्स-शोरूम आणि ऑन-रोड किंमतींमधील खरा फरक
  • BSNLचा ‘हा’ आहे ऑल इन वन प्लॅन, दररोज 3 जीबी हाय स्पीड डेटा आणि अमर्यादित कॉलिंग
  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in