• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नेते जेव्हा सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा…, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीच्या पोस्टने मोठी खळबळ, काही तरी मोठं घडणार?

July 30, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएममध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांतर खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या सर्व घडामोडी सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेता केंद्र बिंदू ठरल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड यांनी ट्विटरवर केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेमध्ये आली आहे.

नेमकं काय म्हणााल्या नताशा आव्हाड? 

‘जेव्हा जेव्हा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे खासदार आणि नेते सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात, तेव्हा काहीतरी मोठी घटना घडते. कदाचित त्यांनी याकडे ईश्वराचा संकेत म्हणून पाहावे आणि आपण जिथे आहोत तिथेच राहण्याचा निर्णय घ्यावा.’  असं ट्विट नताशा आव्हाड यांनी केलं आहे.

 

जेव्हा जेव्हा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे खासदार आणि नेते सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात, तेव्हा काहीतरी मोठी घटना घडते. कदाचित त्यांनी याकडे ईश्वराचा संकेत म्हणून पाहावे आणि आपण जिथे आहोत तिथेच राहण्याचा निर्णय घ्यावा. ✌

— Natasha Awhad (@NatashaASpeaks) July 29, 2026

चर्चेला उधाण 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपमधील नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, या सर्व पार्श्वभूमीवर आता नताशा आव्हाड यांचं हे ट्विट चर्चेत आलं आहे. राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या ट्विटला महत्त्व प्राप्त झालं आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकाच हायवेवर वेगवेगळ्या ठिकाणी का असते ‘स्पीड लिमिट’? जाणून घ्या यामागचे रंजक गणित
  • टोयोटाची बाजारात मोठी घोषणा; ‘Urban Cruiser Hyryder’ चे शानदार ‘Aero Black Edition’ लाँच
  • ‘विनफास्ट’चा धमाका; कारनंतर आता भारतात आणणार जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर, डिझाईन पेटंट फायनल
  • Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
  • Salman Khan : ‘बंटवारा 1947’ पाहताच भाईजानने केला खास कॉल, काय म्हणाला सलमान खान ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in