• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नीरज चोप्राला मोठा धक्का, एशियन गेम्सपूर्वी महत्त्वाची माहिती समोर; म्हणाला हे तर खूपच…

August 29, 2026 by admin Leave a Comment

एशियन गेम्स 2026 स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान आयची आणि नागोया येथे होणार आहे. या स्पर्धेत विविध क्रीडाप्रकार होणार आहेत. यापैकी काही खेळांमध्ये भारताला पदक मिळणार हे निश्चित दिसत आहे. असं असताना खात्रीलायक पदकाच्या अपेक्षाला सुरूंग लागला आहे. कारण भारताचा दिग्गज भालाफेकपटू नीरज चोप्रा या स्पर्धेला मुकला आहे. दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. खरं तर या स्पर्धत आपलं सुवर्णपदक राखण्यासाठी नीजर उतरणार आहेत. पण या स्पर्धेपूर्वीचं त्याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इतकंच काय तर 5 सप्टेंबर रोजी प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीलाही मुकला आहे. या स्पर्धेत 88.05 मीटर लांब भालाफेक केल्यानंतर सरावादरम्यान त्याच्या घोट्यातील लिगामेंट फाटले आणि वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली आणि घाईघाईने मैदानात उतरण्याऐवजी पूर्णपणे बरं होण्याला प्राधान्य दिलं. त्यामुळे उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली.

नीरज चोप्राही या दुखापतीनंतर नाराज झाला आहे. त्याने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. नीरज चोप्रा म्हणाला की, ‘हे खूप निराशाजनक आहे, कारण मला वाटत होते की मी माझा जुना फॉर्म परत मिळवण्याच्या अगदी जवळ आलो आहे. असं म्हणतात की, अडथळे हा प्रवासाचाच एक भाग असतात. आता माझे संपूर्ण लक्ष योग्य पुनर्वसनावर असेल, जेणेकरून मी अधिक मजबूत होऊन मैदानात पुनरागमन करू शकेन.’

pic.twitter.com/LwounijYk7

— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) August 29, 2026

नीरज चोप्राने शुक्रवारी डायमंड लीग स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. पण आता अंतिम सामन्याला मुकला आहे. तर एशियन गेम्स स्पर्धेतही खेळू शकणार नाही.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
  • नेपाळमध्ये जलप्रलय, भेंडवळचं भाकित खरं ठरलं? काय आहे कनेक्शन?
  • Uravshi Rautela : क्रिती सॅननच्या ‘त्या’ लूकवरून वाद काही थांबेना; कंगनानंतर उर्वशीही मैदानात, म्हणाली…
  • Nepal Floods : नेपाळनंतर आता भारतात महापुराचं संकट, गावांना पाण्याचा वेढा; घरांमध्ये पाणी शिरलं, रेस्क्यू ऑपरेशनला सुुरुवात
  • नोकरी गेली तरी नो टेन्शन! सरकारी तिजोरीतले हजारो रुपये येणार कामी; वाचा तुमचे पैसे कसे काढायचे?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in