• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नीट पेपरफुटीनंतर आता आणखी एका परीक्षेत मोठा गोंधळ, ऐनवेळी तब्बल दोन तास…सर्वत्र संताप!

May 30, 2026 by admin Leave a Comment


CUET UG 2026 : संपूर्ण देसभरात सध्या नीट परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरण चर्चेत आहे. या नीटच्या पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्र असल्याने या प्रकरणाची राज्यातही चर्चा आहे. या प्रकरणी आतापर्यंत महाराष्ट्रात अनेकांना अटक करणय्ता आली आहे. दुसरीकडे ही परीक्षा आयोजित करणाऱ्या सरकारच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीए या संस्थेवरही राज्यभरातून संताप व्यक्त केली जात आहे. नीटचा पेपर फुटेपर्यंत ही संस्था नेमकं काय करत होती? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, एकीकडे नीट पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता दुसरीकडे एनटीएकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कॉमन यूनिव्हर्सिटी इंन्ट्रन्स टेस्ट अर्थात CUET UG 2026 या परीक्षेतील गोंधळ समोर आला आहे. परीक्षा सुरू असताना तांत्रिक बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठ तब्बल दोन तास उशीर झाल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार 30 मे रोजी CUET UG 2026 ही परीक्षा घेण्यात आली. परंतु या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर मोठी गडबड झाली. त्यामुळेच ही परीक्षा नियोजित वेळेवर होऊ शकली नाही. या परीत्रक्षेसाठी उशीर झाला. या प्रकरणावर एनटीएने स्पष्टीकरण दिले आहे. परीक्षा घेण्यासाठी भागीदार असलेल्या टीसीएसने परीक्षेदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचे आम्हाला सांगितले आहे, असे एनटीएने सांगितले. हा तांत्रिक घोळ आता मिटला असून परीक्षार्थींना ठऱल्याप्रमाणे पूर्ण वेळ देण्यात आलेला आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची आम्ही काळजी घेतलेली आहे, असेही एनटीएने सांगितले आहे.

परीक्षेला लागले दोन तास

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार या गोंधळामुळे दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षेचाही वेळापत्रक ऐनवेळी बदलावे लागले. परीक्षार्थींना अडीच वाजता परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाईल. त्यानंतर तीन ऐवजी सुरू होणारी परीक्षा ही चार वाजता सुरू होईल, असे एनटीएने सांगितले आहे. पहिल्या सत्रातील परीक्षा ही सकाळी नऊ वाजता होणार होती. परंतु या परीक्षेलादेखील दोन तासांनी उशिरा सुरू झाली. या गोंधळ समोर आल्यानंतर विद्यार्थी, पालकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in