• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नियम मोडाल तर खबरदार! तुकाराम मुंढेंचा थेट इशारा, हॉटेल, रेस्टॉरंट्सने नियम न पाळल्यास मोठी कारवाई!

June 24, 2026 by admin Leave a Comment


Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाने विभागाचे प्रधान सचिव पद स्वीकारल्यानंतर राज्यभरातील हॉटेल्स, खाणावळी, रेस्टॉरंट, फळविक्री केंद्र तसेच अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडून भेसळयुक्त अन्नपदार्थ, केमिकलयुक्त खाद्यपदार्थांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान, आता तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन अन्न पदार्थ विकणाऱ्या आस्थापना, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यासायिकांना इशारा दिला आहे. अन्न पदार्थ संदर्भातील सर्व नियमावली पाळावी अन्यथा कारवाई केली जाईल, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.

नियम पाळायचे नसतील तर व्यवसाय बंद ठेवा

आता अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अन्न सुरक्षा, स्वच्छता यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच संबंधित आस्थापनांजवळ असलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. उद्यापासून अन्न आणि औषध प्रशासनाकडून त्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. नियमानुसार चालणाऱ्या व्यावसायिकांनी घाबरण्याची गरज नाही. पण जे नियमानुसार चालणार नाहीत त्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवावेत, असा कडक इशारा मुंढे यांनी दिला आहे.

राज्यात 11 लाखापेक्षा जास्त लायन्सस रसिस्टर्ड करण्यात आलेले आहेत. आम्ही लोकांची मदत करत आहोत. अन्नपदार्था संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणं बंधनकार करण्यात आलेलं आहे. हाॉटेलकडे नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. स्ट्रीट फूड विकणाऱ्यांवरही लक्ष असेल. स्वच्छतेचे पालन करावे लागेल. कर्मचऱ्यांना वैद्यकीय प्रशीक्षण द्यावे लागेल. ग्राहकांना मोफत पाणी देणे बंधनकारक असणार आहे, अशी नियमावलीही तुकाराम मुंढे यांनी सांगितली आहे.

तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक

यासोबतच प्रत्येक आस्थापनेत खाद्यपदार्थांचा बोर्ड लावणे गरजेचे आहे. त्या अन्नपदार्थात किती कॅलरीज आहेत. किती पोषक आहे, याचीही माहिती देणे बंधनकराक आहे. खाद्यपदार्थ देण्यासाठी छापील कागदाचा वापर करता येणार नाही. प्रत्येक किचनाला एक परवाना देण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही दंडात्मक मोहीम सुरू करणार आहोत. ही मोहीम कायमस्वरुपी चालणार आहे. तक्रार करण्यासाठी आम्ही टोल फ्री नंबरही दिलेला आहे. त्यावर लोकांना तक्रार करता येईल, असेही तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 100 नवीन वाहनं, अदाणी फाऊंडेशनकडून 15 कोटींचा निधी
  • CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं बाहेर काढेन; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा थेट इशारा, म्हणाली ‘27.11.23’ची ती सकाळ आठवतेय?
  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in