
अभिनेते रवी किशन यांनी बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेविश्वात स्वतःचं नाव मोठं केलं आहे. राजकारणात देखील रवी किशन सक्रिय आहेत. अभिनेते कायम कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पण आता ते मुली आणि त्यांच्या करीयरमुळे चर्चेत आले आहे.
अभिनेते रवी किशन यांनी 1993 मध्ये प्रिती शुक्ला यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी 4 मुलांचं जगात स्वागत केलं. त्यांनी तीन मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांच्या तिन्ही मुली वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्या तिसऱ्या मुलीने देश सेवा करण्याचा निर्णय घेतला. तर अन्य दोघी काय करतात जाणून घ्या.
रवी किशन यांची एक मुलगी तनिष्का मार्केटिंग क्षेत्रात काम करत आहे. तर दुसरी लेक रिवा, वडिलांप्रमाणे अभिनय विश्वाचा एक भाग आहे. ती अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. तर सोशल मीडियावर देखील ती कायम सक्रिय असते.
रवी किशन यांची तिसरी लेक इशिता शुक्ला हिने वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्राची निवड केली नाही. तिने देश सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल कॅडेट कोर्प्स (NCC) मधील सहभागामुळे ती सर्वप्रथम प्रकाशझोतात आली; तिथे तिने लष्करी प्रशिक्षण घेतलेलं. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या तयारीमध्येही तिचा सहभाग होता.
'महिला दिन 2025'च्या निमित्ताने 'इन्स्टंट बॉलीवूड'शी बोलताना रवी किशन यांनी आपल्या मुलीबद्दल सांगितले की, “माझी मुलगी लष्करात रुजू होत आहे. ती एक स्नायपर शूटर आहे.”, इशिता सोशल मीडियावर देखली कायम सक्रिय असते. NCC ट्रेनिंग दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते.




Leave a Reply