• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नाचणी पासून बनवा ‘हे’ 5 पौष्टिक नाश्त्याचे पदार्थ, शरीरात दिवसभर टिकून राहील ऊर्जा

July 5, 2026 by admin Leave a Comment


आजकाल हेल्दी डाएट पालन करण्यासाठी नाचणी एक सुपरफूड म्हणून अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. कारण त्यात कॅल्शियम, फायबर, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजे असतात. नाचणीमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे शरीराचे पोषण करण्यास मदत करतात. म्हणूनच याला संतुलित आहाराचा एक आवश्यक भाग मानले जाते. त्यामुळे अनेकजण स्वस्थ आहार म्‍हंटल की नाचणीचा त्यांच्‍या आहारात समावेश करतात.

नाचणीचे नियमित आणि संतुलित प्रमाणात सेवन केल्याने दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा मिळण्यास , पचनसंस्था सुधारण्यास आणि पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होते. त्यातील कॅल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी देखील आवश्यक मानले जाते. चला तर मग नाचणीपासून बनवता येणारे आरोग्यदायी नाश्त्याचे प्रकार तसेच अधिक पौष्टिक कसे बनवायचे आणि सेवन करताना कोणती खबरदारी घ्यावी, याबद्दल जाणून घेऊयात.

नाचणीपासून बनवा हे 5 पौष्टिक आणि चविष्ट नाश्त्याचे प्रकार

नाचणी डोसा

नाचणीचे पीठात दही किंवा डोशाचे पीठ घेऊन थोडे पाणी आणि चवीनुसार मसाले एकत्र करून मिश्रण तयार करा. आता तव्यावर पातळ गोलाकार पद्धतीने पसरवून दोन्ही बाजूंनी शिजवा. नारळाची चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा. हा फायबर, कॅल्शियम आणि प्रथिनांनी समृद्ध असलेला नाश्ता आहे, जो दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करू शकतो.

रागी चीला

नाचणीच्या पिठात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मसाले मिक्स करून मिश्रण तयार करा. तव्यात थोडे तेल टाकून पॅनकेकप्रमाणे मिश्रण टाका आणि छान शिजवून घ्या. हा एक झटपट, पौष्टिक नाश्ता आहे, जो फायबर आणि प्रथिनांनी समृद्ध असून बराच वेळ पोट भरलेले ठेवतो.

नाचणीची लापशी

नाचणीचे पीठ घ्या आणि त्यात दूध किंवा पाणी टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवर शिजवा. चवीसाठी गूळ, वेलची आणि कापलेले बदाम किंवा अक्रोड यात तुम्ही टाकू शकता. हा एक हलका आणि पौष्टिक नाश्ता आहे, जो ऊर्जा, कॅल्शियम आणि लोह पुरवतो.

नाचणी इडली

पारंपरिक इडलीच्या पिठात नाचणीचे पीठ घालून ते चांगले आंबवून घ्या. नंतर ते इडलीच्या साच्यात ओतून वाफवून घ्या. सांबार आणि चटणीसोबत सर्व्ह करा. हा एक हलका, सहज पचणारा आणि फायबर व कॅल्शियमने समृद्ध नाश्ता मानला जातो.

नाचणीपासून बनवा उपमा

नाचणीचे पीठ हलके भाजून घ्या. नंतर कढईत मोहरी, कढीपत्ता, कांदे, गाजर, वाटाणे आणि इतर भाज्या परतून घ्या, मग त्यात नाचणीचे भाजलेले पीठआणि पाणी टाकून शिजवा. हा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक नाश्ता आहे, जो फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असून दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देण्यास मदत करू शकतो.

नाचणीला अधिक पौष्टिक बनवण्यासाठी त्यात कोणते घटक घालता येतात?

नाचणीसोबत दूध, दही, चीज, मोड आलेली कडधान्ये आणि शेंगदाणे यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ एकत्र खाल्ले जाऊ शकतात. त्यात केळी, सफरचंद किंवा इतर हंगामी फळांचाही समावेश करता येतो.

बदाम, अक्रोड, काजू, चिया सीड्स, जवस आणि भोपळ्याच्या बिया घातल्याने त्याचे पौष्टिक मूल्य आणखी वाढू शकते. गाजर, पालक, वाटाणे आणि ढोबळी मिरची यांसारख्या भाज्या घातल्याने ते जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने देखील समृद्ध होऊ शकते.

नाचणी खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

नाचणीचे सेवन नेहमी प्रमाणात करा आणि संतुलित आहारात समावेश करा. भरपूर पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे, कारण त्यात फायबर भरपूर प्रमाणात असते.

अधिक संतुलित आहार तयार करण्यासाठी नाचणीसोबत प्रथिने आणि भाज्यांचा समावेश करा. जर तुम्हाला किडनी किंवा इतर गंभीर आरोग्य समस्या असतील तर नियमितपणे नाचणीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ञांचा सल्ला घेणे उत्तम.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in