• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नाग चैतन्यने समंथाला फसवलं, असं म्हणणाऱ्यांची आता खैर नाही; कोर्टाने थेट..

May 31, 2026 by admin Leave a Comment


दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यने त्याच्या ओळखीचा गैरवापर करणाऱ्या आणि त्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणाऱ्या ऑनलाइन कंटेंटविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 2021 मध्ये समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर त्याच्यावर फसवणुकीचा आरोप झाला होता. नाग चैतन्यविरोधात सोशल मीडियावर विविध निराधार आरोप झाले होते. याविरोधात त्याने कोर्टात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नाग चैतन्यची पूर्वी पत्नी समंथासोबतच्या संबंधांबद्दल सोशल मीडिया आणि इंटरनेटवर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या आणि अश्लील दाव्यांविरोधात न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. नाग चैतन्यच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने त्याच्याविरोधात बदनामीकारक मजकूर पोस्ट करणाऱ्या साइट्सना केवळ नोटीस बजावली नाही तर त्याचे नाव, फोटो आणि व्हिडीओ यांच्या गैरवापरावर अंतरिम मनाई हुकूमही जारी केला आहे.

नाग चैतन्यने त्याच्या याचिकेत म्हटलं होतं की, काही लोकं आणि वेबसाइट्स त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी त्याचे फोटो, व्हिडीओ आणि नावाचा गैरवापर करत आहेत. परवानगीशिवाय त्याची ओळख वापरून समंथासोबतच्या त्याच्या संबंधांबद्दल निराधार अफवा ऑनलाइन पसरवल्या जात होत्या. न्यायालयात नाग चैतन्यचं प्रतिनिधित्व करताना त्याचे वकील वैभव गग्गर यांनी युक्तिवाद केली की, इंटरनेटवरील काही ऑनलाइन कंटेटने नाग चैतन्यचं अत्यंत चुकीच्या पद्धतीने चित्रण केलं आहे. या पोस्ट आणि व्हिडीओंमध्ये असा खोटा दावा केला जातोय की, त्याने समंथाचा विश्वासघात केला आणि तिचं करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. ही खरी टीका नसून हेतुपुरस्सर केलेलं ट्रोलिंग आहे.

ज्योती सिंह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता समंथा आणि नाग चैतन्य यांच्या नात्याबद्दल खोटे आरोप करणाऱ्या सर्व वेबसाइट्स आणि प्लॅटफॉर्म्सना नोटीस बजावली आहे. खंडपीठाने नाग चैतन्यच्या नावाचा आणि चेहऱ्याचा (फोटो) गैरवापर करण्यावर अंतरिम स्थगिती आदेश जारी करत असल्याचं स्पष्ट केलं आहे, अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली आहे.

समंथा आणि नाग चैतन्य यांनी 2017 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर 2021 मध्ये हे दोघं विभक्त झाले. घटस्फोटानंतर नाग चैतन्यला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर 2024 मध्ये त्याने अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं. तर समंथाही तिच्या आयुष्यात पुढे गेली असून डिसेंबर 2025 मध्ये तिने निर्माता-दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरं लग्न केलं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PF मधून आज काढले 1 लाख तर निवृत्तीनंतर 11 लाखाचे नुकसान?, एक्सपर्टने समजावले गणित
  • ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
  • संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’च्या सेटवर घडला मोठा अनर्थ; शूटिंगदरम्यान तंत्रज्ञाचा मृत्यू
  • 6 खासदारांचा पक्षप्रवेश होताच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, प्रश्न सोडवण्यासाठी घेतला मोठा निर्णय
  • Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in