• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नव्या मेट्रोच्या छतातून बरसत्या धारा पाहून प्रवासी चिडले, video व्हायरल

May 23, 2026 by admin Leave a Comment


पुण्यात मेट्रो सुरु झाल्याने पुणेकरांना ट्रॅफीक जाममधून मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, पुण्यात होत असलेल्या पावसाने शहरातील मेट्रो कोचच्या डब्यांच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. कारण, पुणे मेट्रोच्या कोचमध्ये पाण्याची संततधार लागल्याने मेट्रोमध्येच छत्री उघडण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ देखील समाजमाध्यमावर व्हायरल होत असून लोक नव्या कोऱ्या मेट्रोच्या छतातून पाणी टपकताना पाहून हैराण झाले आहेत.

पुणे शहराची अफाट झालेली वाढ आणि पुण्यातील सार्वजनिक वाहतूकीची अवस्था पाहून मेट्रोला मोठी मागणी होत होती. अखेर पुण्यात मेट्रोच्या मार्गिका सुरु झाल्याने पुणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.पुणे मेट्रोचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात नव्या कोऱ्या मेट्रोच्या कोचमधून पाणी गळताना दिसत आहे.मेट्रोमधील पाणी गळतानाचा हा व्हिडीओ समाजमाध्यमावर चांगलाच व्हायलर झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांनी पुणे शहरातील इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सोशल मीडियावर अनेक युजर्सने प्रतिक्रीया दिल्या आहेत की पुणे मेट्रो शहरातील नवीन पब्लिक ट्रान्सपोर्ट योजनेत सामील आहे. अशावेळी कोचच्या छतामधून पाण्याची गळतीने चिंता व्यक्त केली जात आहे. लोकांचे म्हणणे आहे की रोजच्या हजारो प्रवाशांच्यासाठी तयार केलेली मेट्रो व्यवस्था सामान्य मान्सूनच्या पावसाचा सामना करण्यासाठी संपूर्णपणे सुसज्ज करायला हवी.

अनेक लोकांनी मेट्रोच्या डब्यांची गुणवत्ता आणि देखभालीवरही प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. युजर्सने म्हटले आहे की जर नव्या कोऱ्या मेट्रोच्या डब्यात अशी समस्या निर्माण होत असेल तर सार्वजनिक सुविधांच्या मजबूतीवर मोठा सवाल निर्माण होत आहे.

येथे व्हिडीओ पाहा –

बारिश को नहीं झेल पाई Pune Metro, कोच में टपकने लगा पानी, जलभराव की बन गई स्थिति pic.twitter.com/1nWb58c4dN

— ऋषभ त्यागी (वशिष्ठ) (@RISHABH79RAAZ) May 23, 2026

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता लोक हे जाणू इच्छीत आहेत की अखेर आधुनिक मेट्रो सिस्टीमची अशी स्थिती कशामुळे झाली आणि भविष्यात अशा घटनांना रोखण्यासाठी काय पावले उचलली जातील. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि शेअर केला जात आहे.

 





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in