• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नव्या नवरीप्रमाणे अभिनेत्रीला हवा अखेरचा निरोप… अमिताभ बच्चन यांच्यासमोर केला शेवटचा मेकअप

April 28, 2026 by admin Leave a Comment


मला जगाचा निरोप एखाद्या नव्या नवरीप्रमाणे घ्यायचा आहे… अशी अभिनेत्रीची शेवटची इच्छा होती आणि ती इच्छा तिची पूर्ण देखील झाली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री स्मिता पाटील आहे… स्मिता पाटील हिने त्याकाळी बॉलिवूड गाजवला होता. ‘मंडी’, ‘अर्थ’, ‘अर्ध सत्य’ यांसारख्या एकापेक्षा एक सिनेमात दमदार भूमिका साकारत अभिनेत्री चाहत्यांना वेडं केलं. पण वयाच्या 31 व्या वर्षी स्मिता सर्वांना रडवून तिच्या पुढच्या प्रवासासाठी गेला… मुलगा प्रतिक बब्बर याच्या जन्माच्या काही दिवसांनंतर अभिनेत्रीचं निधन झालं… मृत्यूनंतर विवाहित स्त्रीच्या रुपात सर्वांनी मला अखेरचा निरोप द्यावा.. अशी तिची शेवटची इच्छ होती. जिवंत असताना अभिनेत्री सतत आईला शेवटच्या इच्छेबद्दल सांगायची. याबद्दल मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी मोठं सत्य सांगितलं होतं.

स्मिता पाटील हिने मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांच्याकडे देखील शेवटची इच्छा व्यक्त केली होती. स्मिताची शेवटची इच्छा सांगताना दीपक म्हणाले, ‘स्मिता मला कायम म्हणायच्या माझं निधन झाल्यानंतर मला नव्या नवरी सारखं तयार कर…’

दीपक सावंत यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘एकदा स्मिता पाटील यांनी मला राज कपूर झोपलेले असताना मेकअप करताना पाहिलं होते. तेव्हा स्मिता मला म्हणाल्या होत्या माझा देखील असाच मेकअप कर. पण मी नकार दिला. म्हणालो मॅडम माझ्याकडून असं होणार नाही… एका मृत व्यक्तीचा मेकअप करत आहे… असं मला वाटेल…’

‘पण एक दिवस असा येईल आणि स्मिता झोपलेल्या असताना मला त्यांचा मेकअप करावा लागेल असं वाटलं देखील नव्हतं… स्मिता पाटील यांना मृत्यूनंतर नव्या नवरी सारखं नटवलं होतं. ‘ असं देखील मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत म्हणाले होते.

अमिताभ बच्चन यांच्यासमोर केला मेकअप

सावंत पुढे म्हणाले, ‘स्मिता यांच्या आईने माझ्या हातात मेकअप किट दिला आणि विवाहित स्त्री म्हणून जाण्याची तिची शेवटची इच्छा आहे… त्याठिकाणी समोर अमिताभ बच्चन आणि अन्य व्यक्ती देखील बसलेले होते. रडत मी स्मिता यांचा मेकअप केला… त्यांचा तो शेवटचा मेकअप होता. तेव्हा देखील स्मिता प्रचंड सुंदर दिसत होत्या…’

राज बब्बर यांच्यासोबत स्मिताचं लग्न

स्मिता पाटील यांनी 1983 मध्ये अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर मुलगा प्रतिक याचं जहात स्वागत केलं. पण , 13 डिसेंबर 1986 रोजी प्रसूतीदरम्यान स्मिताचा मृत्यू झाला. यानंतर राज बब्बर आपल्या पहिल्या पत्नी नादिरासोबत राहू लागले. नादिरा आणि राज बब्बर यांचं लग्न 1975 मध्ये झालं होतं. त्यांना आर्या बब्बर आणि जुही बब्बर ही दोन मुले आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठी सक्तीचा मुद्दा सरकारनेच गुंडाळला? परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या भूमिकेमुळे टॅक्सी, रिक्षा चालक बिनधास्त!
  • पुण्यात वसुलीवरून हाणामारी.. एजंटला प्रकरण भोवणार? आरबीआयचा तो नियम येणार अंगलट?
  • निशिगंधा वाड यांचं चित्रपटसृष्टीत दमदार कमबॅक; ‘तुला पाहते’मध्ये तीन पिढ्यांची गोष्ट
  • India New Zealand FTA : चीयर्स! भारत-न्यूझीलंड FTA मध्ये मद्य प्रेमींसाठी खास सरप्राइज, कुठली दारु होणार स्वस्त?
  • Real vs Fake Watermelon : कलिंगड केमिकलयुक्त आहे की नाही? कसं ओळखाल? या 3 गोष्टी पटकन चेक करा; नाही तर जीवावर बेतेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in