• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Real vs Fake Watermelon : कलिंगड केमिकलयुक्त आहे की नाही? कसं ओळखाल? या 3 गोष्टी पटकन चेक करा; नाही तर जीवावर बेतेल

April 28, 2026 by admin Leave a Comment


Real vs Fake Watermelon : उन्हाळा सुरू होताच बाजारात कलिंगडाची आवक वाढते. गोड, रसाळ कलिंगड खायला सर्वांनाच आवडतं आणि ते शरारासाछीही फायदेशीर असतं. त्यातील पोषक तत्वे आणि पाणी शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात, परंतु खरं, चांगलं कलिंगड खाल्लं, तरच त्याचा फायदा होतो. आजकाल प्रत्येक गोष्टीत भेसळ होत असून, आता तर फळांमधअयेही भेसळ झाल्याचे दिसून येते. त्यातच मुंबईतील पायधुनी इथं एकाच कुटुंबातील चार जणांचा रविवारी रात्री विषबाधेनं मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. पती, पत्नी आणि दोन मुलींनी रविवारी पात्री आधी बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्लं होतं. पहाटेच त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. नंतर चौघांचाही मृत्यू झाला.

या घटनेमुळे सगळेच हादरले आणि आता कलिंगडाबददल लोकांच्या मनात भीती बसली आहे. खरंतर फळांध्ये, कलिंगडात भेसळ कशी होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना ? कलिंगडाचा बाहेरील थर पूर्णपणे खरा दिसू शकतो, पण त्याला लाल रंग देण्यासाठी त्यात इंजेक्शन देऊन कलर-केमिकल टोचलेली असू शकतात. अशी केमिकल्स मिसळलेले टरबूज खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता आणि त्याचा कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे खरं आणि बनावट टरबूज यांमधील फरक कसा ओळखायचा, तसंच योग्य टरबूज कसे निवडायचं हे जाणून घेऊया. हे सांगणार आहोत.

फूड पॉयझनिंगचा धोका

उन्हाळ्यात कलिंगडाची मागणी जास्त असल्यामुळे, अनेक विक्रेते, ते पिकवण्यासाठी रसायनांचा वापर करतात, ज्यामुळे कलिंगडाला गडद लाल रंग येतो. गोडवा वाढवण्यासाठी त्यात साखरही घातली जाते. त्यामुळे, ग्राहकांची अनेकदा फसवणूक होते आणि ते बनावट कलिंगड विकत घेतात. पण भेसळयुक्त कलिंगड खाल्ल्याने (Adulterated Watermelon) फूड पॉयझनिंग तसेच पोटाच्या विविध समस्या उद्भवू शकतात. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) खरं आणि बनावट टरबूज कसे ओळखावे हे सांगितलं आहे. चला, जाणून घेऊया.

खरं आणि बनावट कलिंगड कसं ओळखायचं ?

– सर्वात सोपी आणि सहज युक्ती म्हणजे टिशू पेपरची युक्ती. जेव्हा तुम्ही कलिंगड विकत घेता, तेव्हा ते पिकले आहे की नाही हे दाखवण्यासाठी दुकानदार ते कापतो. जर तुम्ही हे आधीपासून करत नसाल, तर तुम्ही ही युक्ति नक्कीच करू शकता. विक्रेत्याला कलिंगडाचा एक तुकडा कापायला सांगा आणि त्यावर टिश्यू पेपर ठेवा. जर तुम्ही तो टिशू पेपर टरबूजावर ठेवला आणि त्याचा रंग लाल किंवा नारंगी झाला, तर ते कलिंगड, रंग बनावट आहे. जर टिशू पेपरचा रंग बदलला नाही, तर ते फळ अस्सल आहे असं समजा.

– बनावट कलिंगड ओळखण्यासाठी तुम्ही पाण्याची युक्ती देखील वापरू शकता. कलिंगडाटी एक फोड पाण्यात टाका. जर त्यामुळे पाण्याचा रंग लाल झाला, तर ते बनावट आहे. खऱ्या कलिंगडामुळे पाण्याचा रंग कधीही बदलत नाही. रासायनिकरित्या रंगवलेले कलिंगड हे पाण्यात विरघळू लागतं.

– तुम्ही रंगावरूनही कलिंगड ओळखू शकता. जर देठ पिवळसर आणि कोरडा असेल, आणि बुडाशी पिवळा ठिपका असेल, तर ते पिकलेलं असतं. जर देठ हिरवट असेल, बुडाशी पांढरा ठिपका असेल, रंग गडद लाल असेल आणि बिया पांढऱ्या असतील, तर ते बनावट कलिंगड असण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाजपच्या एका बड्या नेत्याने खाल्ला शाकाहारी मासा? नेमकं सत्य काय?
  • पाकिस्तानला घाम फोडणारी बातमी! रशियाने भारताला दिली गुड न्यूज, लवकरच S-400…
  • पचनशक्ती वाढवण्यासाठी ‘ही’ फळे ठरतील वरदान, आतड्यांचे आरोग्य सुधारेल
  • हा चित्रपट पाहून थिएटरमध्ये रडायचे प्रेक्षक, 25 वर्षांपूर्वी झालेला प्रदर्शित, केलेली बजेटच्या दुप्पट कमाई
  • अजित पवारांच्या अपघातातील विमानाचा CDR अमेरिकेच्या… रोहित पवारांचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in