• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नवऱ्याला बाथरूमच्या फरशी खालीच का गाडलं? रूबीच्या खुलाश्याने फुटला घाम; ती चूक भोवली अन्…. बाथरूम मर्डरचं बिंग कसं फुटलं?

July 4, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्रातील सिया गोयल प्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेला होता. पण सिया गोयल प्रकरणापेक्षाही डेंजर प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील बाथरूम मर्डरने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आरोपी मग तो पुरुष असो की स्त्री कोणत्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतात हे या प्रकरणातून स्पष्ट झालं आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका महिलेने तिच्या नवऱ्यालाच संपवून टाकलं. त्यानंतर तिने नवऱ्याची डेडबॉडी घरातील बाथरूममध्येच पुरली. अत्यंत शिताफिने तिने हे काम केलं. कुणालाही त्याची कुणकुण लागली नाही. इतकेच नाही तर तिने 45 दिवस पोलिसांनाच काय कुणालाही कळणार नाही याची तिने खबरदारी घेतली. पण एक चूक नडली आणि ती पकडल्या गेली.

रुबी शर्मा असं या महिलेचं नाव आहे. तर तिच्या नवऱ्याचं नाव सुरेंद्र शर्मा असं आहे. सुरेंद्र आणि रूबी रेणुका धाम कॉलनीत राहत होते. 16 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांना प्राची आणि सिद्धी ही दोन मुली आहेत. सुरेंद्रची आई कमला त्यांच्यासोबतच राहत होती. सुरेंद्रला दारूचं व्यसन होतं. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणं व्हायचे. या भांडणाला वैतागून तिने नवऱ्याला मारण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी तिने दोन्ही मुलींना आणि सासूला दीराच्या घरी पाठवलं. त्यानंतर रात्री जेवण बनवलं. त्या दिवशी तिने मुद्दाम खीर बनवली होती. ही खीरच सुरेंद्रसाठी जीवघेणी ठरली.

झोपेच्या 20 गोळ्या…

पोलिसांनी रुबीला पकडल्यानंतर तिने बहाणे देण्यास सुरुवात केली. सतत बयान बदलत होती. आधी नवऱ्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं म्हटलं. नवऱ्याने आत्महत्या केल्याने घाबरून त्याला घरातच दफन केल्याचं तिने सांगितलं. नंतर नवऱ्याने झोपेच्या गोळ्या घेतल्याचं म्हटलं. पोलिसांनी दट्ट्या दिल्यावर तिने सर्व काही खरं खरं सांगितलं. नवऱ्याला खिरीमध्ये झोपेच्या 20 गोळ्या दिल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला असं तिने सांगितलं.

म्हणून बाथरूममध्ये दफन

बाथरूममध्येच का त्याला दफन केलं? असा सवाल तिला करण्यात आला. ते रहस्यही तिने उघड केलं. बाथरूमची लादी हॉलच्या लादीपेक्षा तीन फूट खोल होती. त्यामुळे तिथेच त्याचा मृतदेह टाकला. त्यावर माती टाकली आणि मिस्त्री बोलावून सिमेंट काँक्रिट टाकलं. त्यानंतर त्यावर लादी बसवली, असं तिने सांगितलं. त्यामुळे कुणालाच काही संशय आला नाही, असं तिने सांगितलं.

असं फुटलं बिंग…

2017मध्ये सुरेंद्रच्या विरोधात ट्रक चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. त्या संदर्भात माहिती काढण्यासाठी पोलीस रूबीच्या घरी आले. पोलिसांनी रूबीला सुरेंद्रच्या बाबत विचारलं. तेव्हा तिने तो गायब असल्याचं सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी रूबीचा फोटो काढला. फोटो काढताच रूबी घाबरली. तिला वाटलं सुरेंद्रची हत्या केल्याचं कुणी तरी पोलिसांना सांगितलं. त्यामुळेच पोलीस घरी आले. त्यामुळे तिने शुक्रवारी तात्काळ दीराला फोन करून बोलावून घेतलं. तसेच तिने काय घडलं याची माहिती दिली. सुरेंद्रला कुठे दफन केलं तेही सांगितलं. हे ऐकताच दीर अनिल शर्मा याच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याने लगेच पोलिसांना फोन केला आणि सर्व माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बाथरूममध्ये खोदकाम करून सुरेंद्रची डेडबॉडी हस्तगत केली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in