
सध्या राज्यात मोसमी पाऊस सर्वदूर कधी पसरतो, याची शेतकरी वाट पाहात आहेत. सध्या मोसमी पावसाची वाटचाल संथ गतीने होत आहे. त्यामुळे आता राज्यात काही ठिकाणी दोन ते तीन अशांनी तापमान वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मोसमी पाऊस कोकणातील हर्णे, मध्य महाराष्ट्रताली सोलापूर या भागात स्थिर आहे. परंतु राज्यातील काही भागात पूर्व मोसमी पाऊस अद्याप सक्रीय झालेला नाही.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन ते तीनदिवसांत महाराष्ट्रातील आणखी काही भागात मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. तशी माहिती हवामान विभगाने दिली आहे.
म्हणूनच आता पुढचे दोन ते तीन दिवस राज्यात शेतकरी तसेच सामान्यांना मोसमी पावसाची वाट पाहावी लागणार आहे. तत्त्पूर्वी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात शुक्रवारी उष्ण आणि दमट वातावरण असू शकते.
तर काही भागात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून मराठवाडा, विदर्भातील ब हुतांश भागांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पावसाचा जोर वाढण्यासाठी 18 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.




Leave a Reply