• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धुरंधर होणार ललित मोदी? तो सनसनाटी दावा काय? डॉन 3 च्या वादानंतर रणवीर सिंहविषयी मोठी अपडेट

June 9, 2026 by admin Leave a Comment


Ranveer Singh-Lalit Modi: क्रिकेटचे विश्वच बदलून टाकण्यात ललित मोदींचा मोठा हात असल्याचे मानले जाते. बायोपिकवरून सध्या ललित मोदी चर्चेत आहे. ललित मोदी यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या जीवनावर एक सिनेमा तयार होणार आहे. त्याच्या कथेवर सध्या काम सुरू आहे. या सिनेमात धुरंधर स्टार रणवीर सिंह हा आपली भूमिका करणार असल्याचा सनसनाटी दावा ललित मोदी यांनी केला आहे. रणवीर सिंह यानेच आपल्याकडे ही भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावा मोदींनी केला आहे.

रणवीर सिंह साकारणार ललित मोदी?

ललित मोदी यांनी वृत्त संस्था ANI शी बोलताना हा दावा केला. सध्या आपली टीम या ड्रीम प्रोजेक्टवर काम करत असल्याचे ते म्हणाले. अद्याप पटकथेवर काम सुरू आहे. काम अजून अंतिम टप्प्यात आलेले नसल्याची माहिती त्यांनी दिली. तुमची भूमिका कोण साकारणार असा सवाल मोदी यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी रणवीर सिंह याचे नाव घेतले. रणवीर सिंह या चित्रपटात, सिनेमात माझी भूमिका करू इच्छितो. रणवीर सिंह हा माझ्याकडे आला होता. त्याने या भूमिकेसाठी विचारणा केली होती. मलाही वाटते की माझी भूमिका त्याने साकारावी. पण रणवीर सिंह आता सुपरस्टार झाला आहे. त्यामुळे आता त्याच्याकडे माझ्या भूमिकेसाठी, सिनेमासाठी वेळ असेल की नाही, हे मी सांगू शकत नाही असे मोदी म्हणाले.

रणवीर सिंह याला नाही, त्याच्या बायकोला चांगले ओळखतो

ललित मोदी म्हणाले की मी रणवीर सिंह याला नाही तर त्याची बायको दीपिका पादुकोण हिला चांगले ओळखतो. एक दिवस मला फोन आला की, रणवीर सिंह हा भेटू इच्छित आहे. रणवीर सिंह एका दिवशी मला भेटण्यासाठी लंडनला आला. ही गोष्ट जवळपास दोन वर्षांपूर्वीची आहे. त्या वेळी दोघांची भेट झाली. या भेटीत आपल्याला आयपीएल कमिशनर राहिलेले ललित मोदी यांची भूमिका करायला आवडेल असे रणवीर म्हणाला होता असे मोदी म्हणाले. ललित मोदी म्हणाले की ही जवळपास दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आता रणवीर सिंह हा मोठा स्टार झाला आहे. त्याच्याकडे ही भूमिका करायला तितका वेळ आहे की नाही हे काही माहिती नाही. सध्या या सिनेमाची कथा, पटकथा लिहिण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in