• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘धुरंधर’ फेम गायिकेच्या कृत्यावर चाहते नाराज, परफॉर्मेंस मध्येच स्वतःवर पाणी टाकलं आणि… Video पाहून म्हणाल…

April 22, 2026 by admin Leave a Comment


प्लेबॅक गायिका जास्मिन सँडलस हिने नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ सिनेमात आपल्या गाण्यातून चाहत्यांनी देखील थिरकायला भाग पाडलं. पण आता जास्मिन कोणत्या गाण्यामुळे नाही तर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. स्टेजवर सर्वांसमोर जास्मिन हिने केलेलं वक्तव्य अनेकांना आवडलेलं नाही. जास्मिन हिने नुकताच अहमदाबादमध्ये एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्मेंस दिला. कॉन्सर्ट दरम्यानचा एक व्हिडिओ क्लिप ऑनलाइन समोर आला असून, त्यावर काही नेटकऱ्यांकडून टीका होत आहे. त्यांचा आरोप आहे की, जास्मिनने तिच्या ‘शरारत’ या गाण्यावर लिप-सिंग केलं आणि सादरीकरणादरम्यान स्वतःवर पाणी ओतलं.

जास्मिन सँडलस हिचा अहमदाबाद कॉन्सर्ट

19 एप्रिल रोजी गायिका जास्मिन सँडलस हिचा अहमदाबाद कॉन्सर्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने लेहंगा आणि चोळी घातली आहे आणि ‘शरारत’ गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे. परफॉर्म करत असताना तिने स्वतःवर पाणी ओतलं… एवढंच नाही तर, परफॉर्म सुरु असताना, ती अनेक वेळा आपला मायक्रोफोन खाली करताना दिसली. यामुळे काही प्रेक्षकांनी तिच्यावर टीका केली आणि लाईव्ह कॉन्सर्ट सुर असताना ती फक्त लिप-सिंक करत होती आणि बॅकग्राउंडवर गाणी वाजत होती..

 

 

View this post on Instagram

 

A post shared by @exclusive.celebs

जास्मिन हिने स्टेजवर हूकअप स्टेप देखील केली आणि भन्नाट वातावरण निर्मिती केली… अनेकांनी गायिकेच्या परफॉर्मन्सला डोक्यावर घेतलं. तर अनेकांनी नाराजी व्यक्त केली, कारण जास्मिन हिने लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान लिप – सिंक केलं… सध्या गायिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘लिप – सिंक कशासाठी???’, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘हे लोक लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गात नाहीत…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘हे काय आहे? खरा परफॉर्मन्स कुठे आहे? पार्श्वभूमीवर गाणं वाजत आहे, मग आता लिप-सिंकिंगला परफॉर्मन्स मानलं जातं का? हा एक बनावट परफॉर्मन्स आहे.” असं म्हणत अनेकांनी गायिकेवर निशाणा साधला…





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • LSG vs RR : लखनौचा सलग चौथा पराभव, राजस्थानकडून 40 धावांनी धुव्वा
  • पाच मसाले जे उन्हाळ्यातही ठेवतील तुम्हाला थंड, सेवन आहे खूपच लाभकारक
  • Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषद निवडणूकीसाठी वर्षावर खलबते, सहा जागांसाठी भाजपात १२ इच्छुक, कोणाला लॉटरी ?
  • सामान्यांना सर्वात मोठा दणका, पेट्रोलचा भाव 25 रुपयांनी वाढणार? लवकरच…चिंता वाढली!
  • SAW vs INDW, 3rd T20i : टीम इंडियातून दोघींचा पत्ता कट, अमरावतीकर खेळाडूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in