• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धुरंधरच्या वेळी कुठे होतास? आलिया भट्टच्या ‘अल्फा’चं कौतुक करताच शाहरुखला नेटकऱ्यांनी झापलं

June 11, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री आलिया भट्ट आणि बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘अल्फा’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. हा टीझर प्रदर्शित होताच बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानने सोशल मीडियावर आलिया आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक करणारी एक पोस्ट लिहिली. आलिया भट्ट, बॉबी देओल आणि दिग्दर्शक शिव रावैल यांच्यासाठी शाहरुखने ही खास पोस्ट लिहिली आहे. मात्र ही बाब काही नेटकऱ्यांना अजिबात रुचली नाही. यामागचं कारण म्हणजे शाहरुखने रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही ब्लॉकबस्टर चित्रपटांबद्दल चकार शब्द काढला नव्हता. त्याच्यासाठी कोणतीच पोस्ट शाहरुखने लिहिली नव्हती. मात्र आता आलियासाठी त्याने पोस्ट लिहिल्याने नेटकऱ्यांनी त्याची भूमिका दुटप्पी असल्याचं म्हटलंय.

‘अल्फा’ हा YRF स्पाय युनिव्हर्समधला सातवा चित्रपट आहे. याआधी एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर, पठाण, टायगर 3 आणि वॉर 2 हे स्पाय कथानकाचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ‘अल्फा’चा टीझर शेअर करत शाहरुखने सोशल मीडियावर लिहिलं, ‘शाब्बास आलिया, इतकी वर्षं लोकांची मनं जिंकण्यापासून ते आता हाडं मोडण्यापर्यंत.. तुझ्या कौशल्याचा विस्तार होतच चालला आहे. अल्फाने प्रेक्षकांची मनं जिंकावीत आणि पुढच्या सीक्वेलसाठी काही खलनायकांना शिल्लक ठेवावं. जा त्यांना पकड सिग्मा गर्ल! लॉर्ड बॉबी.. तू खलनायकाच्या भूमिकेत खूपच भारी दिसतोस.. तुम्हा दोघांना घट्ट मिठी.. शिव आणि त्याच्या टीमला खूप शुभेच्छा.’

Sir, Dhurandhar was also released a few months back. Where were you?

— Aman Verma (@amanverma1714) June 10, 2026

Sir, Dhurandhar was also released a few months back. Where were you?

— Aman Verma (@amanverma1714) June 10, 2026

शाहरुखची ही पोस्ट वाचताच नेटकऱ्यांनी एक्स अकाऊंटवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शाहरुखने रणवीर सिंह आणि आदित्य धर यांच्या ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांसाठी अशाच पद्धतीने पोस्ट का लिहिली नाही, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. ‘सर, धुरंधर काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. तेव्हा तुम्ही कुठे होता’, असा सवाल एकाने केला. तर ‘धुरंधर पाहिल्यानंतर YRF चे बकवास स्पाय चित्रपट कोणी पाहणार नाही’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. रणवीरच्या ‘धुरंधर’च्या दोन्ही भागांबद्दल शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी मौन बाळगल्याची टीका सोशल मीडियावर झाली होती.

Did not see any post or support for Dhurandhar for any event, be it Trailer, Release or Success. Expect them to create a perception of Alpha being bigger hit then Dhurandhar.#Alpha

— Cricket Vibes_Arjav (@IamArjav) June 10, 2026

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार ‘धुरंधर 2’चं कौतुक करत असताना अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांसारखे बॉलिवूडमधील मोठे कलाकार का गप्प आहेत, असा सवाल वारंवार सोशल मीडियावर उपस्थित केला जात होता. अखेर एका मुलाखतीत जेव्हा आमिरला पत्रकारांनी प्रश्न विचारला, तेव्हा तो म्हणाला, “हा चित्रपट खूप चांगली कामगिरी करतोय, असं मी ऐकलंय. परंतु मी अद्याप ‘धुरंधर 2’ पाहिलेला नाही. पण या चित्रपटाबद्दल फक्त प्रशंसाच ऐकतोय. ‘धुरंधर 1’ आणि आता ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अतुलनीय कामगिरी केली आहे. मी या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देतो.”



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इनफिनिक्स नोट 60 प्रो चा पिनिनफरिना एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
  • 20 लाखांच्या गुंतवणुकीवर कुठे मिळेल सर्वाधिक परतावा? जाणून घ्या बेस्ट पर्याय
  • Ketan Death Case : … तर केतनचा जीव वाचला असता, अभिनेत्री हिना खान सिया गोयलवर संतापली
  • मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या बैठकीला 24 आमदारांची दांडी, बड्या नेत्यांचाही समावेश
  • जुलैमध्ये लाँच होणाऱ्या Nothing Phone 4b स्मार्टफोनमध्ये असेल हा खास Snapdragon प्रोसेसर, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in