• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या 45 व्या वर्धापनदिन सोहळ्याला सिनेमा, साहित्य, प्रशासनातील मान्यवरांची हजेरी

May 26, 2026 by admin Leave a Comment


26 मे 2026, बेंगळुरू : सिनेमा, साहित्य, प्रशासन आणि सार्वजनिक जीवनातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्वे एका छताखाली एकत्र यावीत, पण तेही ना पुरस्कार सोहळ्यासाठी, ना चित्रपटाच्या लॉन्चसाठी, ना राजकीय परिषदेसाठी… तर ध्यान, सेवा आणि मानवी मूल्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी हे नेमकं कसं शक्य होतं? बेंगळुरूमध्ये आयोजित ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या 45 व्या वर्धापनदिन सोहळ्यात याचं उत्तर एका अनोख्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संगमातून पाहायला मिळालं.

केरळचे राज्यपाल श्री राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी, चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला, अभिनेता विक्रांत मॅसी, अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर, कवी व अभिनेता विनीत कुमार सिंह, ख्यातनाम फोटोग्राफर अविनाश गोवारीकर आणि निर्माता महावीर जैन हे सर्वजण ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर’मध्ये एकत्र आले होते. त्यांनी गुरुदेव श्री श्री रविशंकर आणि ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ने गेल्या साडेचार दशकांत लाखो लोकांच्या आयुष्यावर केलेल्या प्रभावाचा गौरव केला.

विक्रांत मॅसी झाले भावूक

या कार्यक्रमातील सर्वात भावनिक क्षण तेव्हा आला, जेव्हा अभिनेता विक्रांत मॅसी यांनी आगामी ‘व्हाईट’ चित्रपटात गुरुदेवांची भूमिका साकारण्याच्या अनुभवाबद्दल सांगितले. प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांनी म्हटले, ‘हे आश्रम माझं घर आहे. मला माझ्या गुरुंची, माझ्या सर्वस्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्या भूमिकेसाठी मला स्वीकारलं गेलं, याबद्दल मी कृतज्ञ आहे.’

राजकुमार हिरानींचा खास अनुभव

प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी गुरुदेवांशी असलेल्या आपल्या दीर्घ नात्याबद्दल आणि ‘सुदर्शन क्रिया’मुळे वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल सांगितले. ते म्हणाले, ‘मी जेव्हा जेव्हा येथे आलो, तेव्हा मला एक वेगळी ऊर्जा जाणवली. मी नवीन चित्रपट सुरू करण्यापूर्वी माझ्या संपूर्ण टीमला सुदर्शन क्रिया शिकवतो.’ गुरुदेव प्रत्येकाला आपलंसं करून घेतात, याचा उल्लेख करताना ते म्हणाले, ‘पहिल्यांदा गुरुदेवांना भेटताना मला थोडा संकोच वाटला, पण ते काही क्षणांतच तुम्हाला कुटुंबाचा भाग बनवतात.’

सुनील ग्रोव्हरने रंगवली मैफल

अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर यांनी आपल्या खास शैलीत वातावरण हलकंफुलकं केलं. त्यांनी गुरुदेवांसोबतच्या ध्यान सत्राची आठवण सांगताना म्हटलं, ‘आपण मला म्हणाला होता की, ध्यानानंतर माझ्या चेहऱ्यावर हलकेपणा दिसत आहे.’ त्यांच्या या आठवणीवर सभागृहात हशा आणि टाळ्यांचा गजर झाला.

महावीर जैन यांच्याकडून गुरुदेव यांचे कौतुक

निर्माते महावीर जैन यांनी गुरुदेवांनी लाखो लोकांच्या आयुष्यात घडवलेल्या बदलांबद्दल बोलताना सांगितले, ‘आम्ही येथे 70 वर्षे सतत चांगुलपणा वाढवल्याबद्दल आपले आभार मानण्यासाठी आलो आहोत. आपण आम्हाला जगणं शिकवलं.’

अविनाश गोवारीकर यांची भावनिक प्रतिक्रिया

प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी गुरुदेवांशी असलेल्या नात्याबद्दल आणि सुदर्शन क्रियेच्या अनुभवाबद्दल सांगताना भावूक होत म्हटलं, ‘मी पहिल्यांदाच आश्रमात आलो असलो, तरी मला असं वाटतं की मी तुम्हाला आधीपासून ओळखतो. मी रोज सकाळी सुदर्शन क्रिया करतो. आज येथे मला जे स्पंदन जाणवले, ते शब्दांत सांगता येणार नाही.’

विनीत कुमार सिंह यांची कविता

‘छावा’ आणि ‘मुक्काबाज’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेता विनीत कुमार सिंह म्हणाले, ‘मला वाटतं, मी येथे खूप आधी यायला हवं होतं. यानंतर त्यांनी ‘छावा’ चित्रपटातील आपली प्रसिद्ध कविता सादर केली.

राज्यपाल आर्लेकर यांचे गौरवोद्गार

केरळचे राज्यपाल श्री राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी गुरुदेवांनी भारतीय अध्यात्मिक परंपरा जगभर पोहोचवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘अशा ज्ञानी व्यक्ती स्वतःसाठी जगत नाहीत. त्यांचा उद्देश इतरांना उन्नत करणं असतो. आपण भगवान विष्णू पृथ्वीवर अवतार घेतील याची वाट पाहतो, पण महान आध्यात्मिक गुरूंमधूनच दैवी शक्ती प्रकट होत असते. कधी आदि शंकराचार्यांच्या रूपात, तर आजच्या काळात गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या रूपात.’ ते पुढे म्हणाले, ‘आज जगाला मार्गदर्शनासाठी ज्यांची गरज आहे, अशा दुर्मिळ आध्यात्मिक नेत्यांपैकी गुरुदेव एक आहेत.’

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ संदेश

बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ला 45 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यांनी संस्थेच्या तणावमुक्ती कार्यक्रम, युवा सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि मानवसेवा कार्यांचे कौतुक केले.

11 हजार मुलांचा ‘इंट्यूशन फेस्ट’

या दिवसभर चाललेल्या सोहळ्यातील सर्वात विशेष आकर्षण ठरला ‘इंट्यूशन फेस्ट’. या कार्यक्रमात 11 हजारांहून अधिक मुले आणि पालक सहभागी झाले होते. या मुलांनी डोळ्यांवर पट्टी बांधून वाचन, मेमरी गेम्स, पॅटर्न ओळख, ब्लाइंडफोल्ड टिक-टॅक-टो आणि चित्र कॉपी करण्याचे प्रयोग सादर केले. सर्वाधिक आश्चर्याचा क्षण तेव्हा आला, जेव्हा 50 मुलांनी डोळ्यांवर पट्टी बांधून आश्रम परिसरात सायकल चालवली आणि सहजपणे वळणांमधून मार्गक्रमण केले.

गुरुदेव यांचा जीवनावरील संदेश

या प्रसंगी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी जीवनाच्या आध्यात्मिक पैलूवर भाष्य करत म्हटले, ‘संपूर्ण जीवन हे एक नाटक आहे. प्रत्येक कलाकार दिग्दर्शकाकडे लक्ष ठेवतो. मी खात्री देतो की या विश्वाचा दिग्दर्शक तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे. तुम्हीही त्या ‘दिग्दर्शका’कडे लक्ष द्या.’

हा कार्यक्रम केवळ एका संस्थेच्या 45 वर्षांच्या प्रवासाचा उत्सव नव्हता, तर आधुनिक जगात अध्यात्म, सर्जनशीलता, मानसिक स्वास्थ्य, अंतर्ज्ञान आणि सामाजिक जबाबदारी यांचा वाढता संगम अधोरेखित करणारा सांस्कृतिक संदेश ठरला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गाडीचा स्पीड अन् रोड ग्रिप होणार आणखी भारी; जाणून घ्या कारचे टायर्स अपग्रेड करण्याची योग्य पद्धत
  • नवीन गाड्यांमधील ‘हे’ 4 सीक्रेट फीचर्स प्रवासाला बनवतील सुरक्षित अन् सोपे; तुम्हाला माहीत आहेत का?
  • मारुती सुझुकीचा ग्राहकांना मोठा झटका! लाँचिंगनंतर पहिल्यांदाच वाढवली e-Vitara ची किंमत; पाहा किती झाली महाग
  • नवे घर खरेदी करताय? मग बजेटमध्ये ‘या’ अतिरिक्त शुल्कांचा नक्की समावेश करा, नाहीतर होईल आर्थिक कोंडी
  • प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in