• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दोषी आहे म्हणून लपून धमक्या देतो… सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचे गंभीर आरोप, भाईजानने आता असं केलं तरी काय?

June 5, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता सलमान खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे तर चर्चेत असतोच, पण वादग्रस्त कारणांमुळे देखील अधिक चर्चेत असतो. आता सलमान मोठ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. ‘काला हिरण: द बैटल फॉर लेगेसी’ या सिनेमामुळे सध्या वाद टोकाला पोहोचले आहे. सिनेमाच्या निर्मातीची जबाबदारी अमित जानी यांच्यावर आहे. अशात सलमान खान याच्या लिगल टीमने अमित जानी यांना नोटीस बजावली आहे. एवढंच नाही तर, यावर अमित जानी यांनी देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. सलमान खान आणि अमित जानी यांच्यामध्ये वाद सुरु असताना, अभिनेत्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिने देखील वादात उडी घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोमी आली हिने अमित जानी यांना पाठिंबा दिला आहे.

अमित जानी यांनी सोमी अली हिचा पाठिंबा…

अमित जानी यांच्या व्हिडिओवर सोमी अलीने प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये ते सलमान खानच्या लिगल टीमने पाठवलेली नोटीस फाडताना दिसत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोमीने म्हणते, “जे दोषी आहेत ते लपून बसतात आणि धमक्या देतात. तुम्हाला पूर्ण अधिकार आहे; सिनेमा बनवा.”

अमित जानी यांनी सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करून दावा केला आहे की, ते सलमान खानच्या लिगल टीमकडून आलेल्या नोटीसला कोणत्याही प्रकारचं उत्तर देणार नाहीत आणि त्यांनी नोटीस कॅमेऱ्यासमोर फाडून टाकली. अमित जानी यांनी असाही आरोप केला की, त्यांना सतत धमक्या मिळत आहेत. त्यांच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अमित जानी यांनी म्हटलं, ते कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत आणि त्यांच्या सिनेमाचं चित्रीकरण सुरूच ठेवतील.

काय आहे संपूर्ण वाद?

संपूर्ण वादाचं मुख्य कारण कायदेशीर नोटीस आहे, जी सलमान खान याच्या टीमने अमित जानी यांना पाठवली आहे. सिनेमाच्या संबंधित कोणताही कंटेंट, पोस्टर्स किंवा टीझर्स प्रदर्शित करू नयेत, अशी मागणी नोटीसमध्ये करण्यात आली होती. अभिनेत्याच्या टीमने निर्मात्यांकडून लेखी माफीचीही मागणी केली. हा सिनेमा सलमान खानच्या आयुष्यातील सर्वात वादग्रस्त काळवीट शिकार प्रकरणाशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच, सिनेमाची घोषणा झाल्यापासून तो सतत वादाचा विषय ठरला आहे.

अमित जानी यांनी कायदेशीर नोटीस फाडल्याच्या आणि डी-कंपनीच्या नावाने धमक्या मिळाल्याच्या केलेल्या दाव्यांबाबत सलमान खान किंवा त्यांच्या कायदेशीर टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in