• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देश कंगाल होनेवाला है.., डोकं चक्रावणारी सर्वांत मोठ्या आर्थिक संकटाची कहाणी; चिन्मय मांडलेकच्या ‘गव्हर्नर’चा जबरदस्त ट्रेलर

May 27, 2026 by admin Leave a Comment


विपुल शाह निर्मित आणि मराठमोळ्या चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘गव्हर्नर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून इतिहासातील अशा दडपून ठेवलेल्या पानांचा उलगडा होणार आहे, ज्यांची कधीच चर्चा झाली नव्हती. यामध्ये अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत आहे. सस्पेन्सने भरलेल्या टीझरनंतर आता निर्मात्यांनी चित्रपटाचा एक अतिशय दमदार आणि थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. हा ट्रेलर अंगावर शहारे आणतो आणि विचार करायला भाग पाडतो.

‘गव्हर्नर’चा ट्रेलर भारताच्या आर्थिक इतिहासातील त्या सर्वात मोठ्या आणि काळ्याकुट्ट अध्यायावर प्रकाश टाकतो, जेव्हा 1990 साली आपला देश कंगाली आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे देशभर निर्माण झालेला गोंधळ आणि रस्त्यावर उतरलेला जनतेचा संताप या ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. या महासंकटाच्या काळात भारताला बुडण्यापासून वाचवण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घ्यावा लागला, ज्याने सगळंच बदलून टाकलं. ट्रेलर देशाच्या त्या सर्वात कठीण आणि आव्हानात्मक काळाची वास्तव कहाणी मांडतो. मनोज वाजपेयी आणि अदा शर्मा यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे हा चित्रपट खूपच आशादायक वाटतो.

पहा ट्रेलर-

‘गव्हर्नर’ हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे, जो 1990 च्या दशकात भारतावर आलेल्या सर्वात भीषण आर्थिक संकटाचं काळं सत्य समोर आणतो. चित्रपटाचा ट्रेलर एका अशा दमदार कथानकाची झलक देतो, जी प्रेक्षकांना हादरवून सोडेल. यात मनोज वाजपेयी एका ‘गव्हर्नर’च्या कडक आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत, ज्यामध्ये प्रेक्षकांनी त्याला यापूर्वी कधीच पाहिलं नाही. चिन्मय मांडलेकरच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाची दमदार पटकथा सुवेंदु भट्टाचार्य, सौरभ भारत, रवी असरानी आणि विपुल अमृतलाल शाह यांनी एकत्रितपणे लिहिली आहे. हा चित्रपट 12 जून 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटातील मनोज वाजपेयीची भूमिका आरबीआयचे माजी गव्हर्नर एस. व्यंकटरामनन यांच्यापासून प्रेरित असू शकते. ते 1991 च्या आर्थिक संकटाच्या वेळी आरबीआयचे गव्हर्नर होते आणि देशाला मोठ्या संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असं मानलं जातं. मात्र या चित्रपटाची कथा पूर्णपणे त्यांच्यावर आधारित आहे का, याबद्दल निर्मात्यांनी अद्याप अधिकृतपणे स्पष्ट केलेलं नाही.

2025 मध्ये चिन्मय मांडलेकरने ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या हिट कॉमेडी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. यामध्येही मनोज वायपेयीने मुख्य भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी दमदार कामगिरी करण्यासाठी एकत्र आली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in