• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देशाच्या नवीन शिक्षण मंत्र्यांचे शिक्षण किती? प्रल्हाद जोशी यांच्याकडे कोणती डिग्री?

July 25, 2026 by admin Leave a Comment


देशाच्या राजकारणात आज मोठी घडामोड पहायला मिळाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यासोबतच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांच्या विद्यमान मंत्रालयांसोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. आता ते ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयासोबतच शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळणार आहेत. आज आपण प्रल्हाद जोशी नेमके कोण आहेत आणि त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सामान्य कुटुंबात जन्म

प्रल्हाद जोशी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1962 रोजी कर्नाटकातील विजयपुरा येथे झाला. त्यांचे वडील स्वर्गीय व्यंकटेश जोशी हे भारतीय रेल्वेमध्ये कर्मचारी होते, तर त्यांच्या आईचे नाव मालतीबाई होते. सामान्य कुटुंबात वाढलेल्या प्रल्हाद जोशी यांना विद्यार्थी जीवनापासूनच सामाजिक कार्य आणि जनतेच्या हिताच्या मुद्द्यांमध्ये रस होता. पुढे त्यांनी सामाजिक उपक्रमांसोबतच एक बिझनेस उभारला आणि त्यानंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

प्रल्हाद जोशी किती शिकलेले आहेत?

प्रल्हाद जोशी यांनी आपले प्राथमिक शिक्षण रेल्वे स्कूलमधून घेतले. त्यानंतर त्यांनी हुबळी येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी कर्नाटक विद्यापीठ, धारवाड यांच्याशी संलग्न असलेल्या के.एस. आर्ट्स कॉलेज, हुबळी येथे प्रवेश घेतला आणि बॅचलर ऑफ आर्ट्स ही पदवी मिळवली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय झाले.

केंद्रात सांभाळल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

प्रल्हाद जोशी यांनी आतापर्यंत केंद्रात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. 30 मे 2019 रोजी त्यांनी पहिल्यांदा केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांच्याकडे संसदीय कार्य, कोळसा आणि खाण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये त्यांच्याकडे वेळोवेळी विविध महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी सोपवण्यात आली. आता त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. या खात्याला नवीन मंत्री मिळेपर्यंत जोशी हे ही जबाबदारी सांभाळणार आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!
  • नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
  • नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
  • मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
  • मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in