• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘देऊळ बंद 2’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न 2’, ‘या’ विषयावर आधारित असणार कथा

May 30, 2026 by admin Leave a Comment


Mulshi Pattern 2 : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘राजा शिवाजी’नंतर सर्वाधिक चर्चा असलेला चित्रपट म्हणजे ‘देऊळ बंद 2’. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे फलक झळकत आहेत. तब्बल 11 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. आता त्याच्या सिक्वेललाही प्रेक्षकांकडून तितकाच भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

‘देऊळ बंद 2’च्या यशाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांनी चाहत्यांसाठी एक खास सरप्राईज दिले आहे. त्यांनी आपल्या सुपरहिट ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा केली असून, या घोषणेमुळे मराठी चित्रपटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘मुळशी पॅटर्न 2’बाबत प्रवीण तरडेंची मोठी घोषणा

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी आगामी प्रोजेक्ट्सबाबत भाष्य करताना ‘मुळशी पॅटर्न 2’ची माहिती दिली. ते म्हणाले, ‘देऊळ बंद 2’नंतर शक्यतो मी ‘मुळशी पॅटर्न पार्ट 2’कडे वळेन. पहिल्या भागातून मी शेती विकायची नसते, ती जपायची असते हा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता.’

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ‘मुळशी पॅटर्न 2’मध्ये सर्वसामान्यांच्या आयुष्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. तुझ्या-माझ्या घराचं स्वप्न इतकं महाग का झालं, याचं उत्तर या चित्रपटातून मिळेल.’

‘तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट’

चित्रपटाच्या संकल्पनेविषयी अधिक माहिती देताना प्रवीण तरडे म्हणाले, ‘मुळशी पॅटर्न पार्ट 2 – तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट’ हेच चित्रपटाचं शीर्षक असेल. हा चित्रपट इतका खतरनाक आणि प्रभावी असेल की तो पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा येईल आणि शहारे उठतील.’

त्यांच्या या वक्तव्यामुळे चित्रपटाच्या विषयाबाबत उत्सुकता वाढली आहे. विशेषतः भिंतीतल्या वाळूची गोष्ट या उपशीर्षकामुळे चित्रपटाचा संबंध वाळू उत्खनन, बांधकाम व्यवसाय आणि त्यामागील गैरव्यवहारांशी असू शकतो अशी चर्चा रंगू लागली आहे.

वाळूमाफियांवर आधारित असेल का कथानक?

प्रवीण तरडेंनी चित्रपटाच्या कथानकाबाबत अद्याप अधिकृत खुलासा केलेला नसला तरी त्यांनी दिलेल्या संकेतांमुळे हा चित्रपट वाळूमाफिया, अवैध उत्खनन, वाढते बांधकाम खर्च आणि सामान्य माणसाच्या घराच्या स्वप्नाशी निगडित वास्तवावर भाष्य करणारा असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, ‘देऊळ बंद 2’च्या प्रचाराची जबाबदारी पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटाबाबत बैठक घेऊन कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आमदार व्हायचंय? काळजी करू नका, देवाभाऊकडे दैवीशक्ती आहे… बड्या मंत्र्याचं मोठं विधान
  • उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांबद्दल धक्कादायक माहिती, थेट फाटला बुरखा..
  • ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच…
  • उमरग्यात येऊन माफी मागा… ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल
  • Sanjay Raut : बंदूक दाखवतोस साल्या, बंदुक तुझ्या ढुंगणात घालीन, नाव घेऊन बोलतो XXXX, संजय राऊतांचं संजय पाटील यांना ओपन चॅलेंज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in