• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दुपारी लस्सी पिण्यासाठी जात होते, मोटरसायकलला वाहनाची धडक, चिमुकल्यासह चौघांचा जागीच मृत्यू

June 5, 2026 by admin Leave a Comment


दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांवर काळाचा घाला आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. लस्सी पिण्यासाठी एका दुचाकीवरुन जाणाऱ्या चौघा जणांचा भरधाव वाहनाने जबर धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात घडली आहे. या दुर्दैवी अपघातात एका महिला आणि तिच्या एक वर्षांच्या मुलासह चार जणांचा मृत्यू झाला आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर येथील रहिवासी असलेले फासे पारधी जमातीचे काही लोक वरणगाव परिसरात कपीलनगरात पत्र्याचे घर बांधून गेल्या २-३ महिन्यांपासून राहत होते.विजय शंकर काळे (वय १९) हा त्याची मामी ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय ३०) आणि दोन लहान मुले विघ्नेश शंकर चव्हाण (वय १४) आणि मोनालिसा शिवबसप्पा भोसले (वय १) असे चौघे जण दुपारी दुचाकीने लस्सी पिण्यासाठी वरणगाव येथे जात होते. गावाच्या पुढे एका भरधाव वाहनाने त्यांच्या मोटरसायकली जोरदार धडक दिल्यानंतर हे चौघे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या परिसरातील काही लोकांनी दुचाकीला ओळखून त्यांच्या गावात माहिती दिली. त्यानंतर माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना जळगाव जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
  • चीन-पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी, अवघ्या 90 सेकंदात होणार खात्मा; भारताची मोठी योजना काय?
  • बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान…त्या विधानावर किरण पावसकरांचं शेवटी स्पष्टीकरण; म्हणाले मी कधीही…
  • पक्षप्रवेश झाला, आता पुढे काय? शिर्डीत पाय ठेवताच भाऊसाहेब वाकचौरेंनी सांगितला प्लॅन!
  • मोठी बातमी! धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढेंना पदावरून हटवलं, आता नव्या अधिकाऱ्याकडे कार्यभार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in