• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दुधासारख्या गोऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालेला दाऊद इब्राहिम, असायचा तिच्याच मागे, त्यानंतर तिच्यासोबत झालं असं की…

August 2, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये असे अभिनेते आणि अभिनेत्री होऊन गेल्या ज्या एका सिनेमानंतर एका रात्रीत प्रसिद्धी झोतात तर आल्या. पण त्यानंतर अचानक गायब झाल्या. असंच काही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं आहे… सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, जास्मिन धुन्ना आहे… अभिनेत्रीचं जे घडलं ते अत्यंत भयानक आहे… जास्मिन दिसायला प्रचंड सुंदर आणि दुधासारखी गोरी होती… पण जेव्हा दाऊद इब्राहिम अभिनेत्रीच्या नावाची चर्चा रंगू लागली, त्यानंतर जास्मिन बॉलिवूडपासून दूर झाली. त्यानंतर कधीच समोर आली नाही.

जास्मिन धुन्ना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘विराना’ सिनेनानंतर तिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. पण त्यानंतर अभिनेत्री कोणत्याच सिनेमात दिसली नाही. प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम रामसेम आणि तुलसी रामसेम दिग्दर्शित सिनेमाने 60 लाख रुपयांच्या बजेटमध्ये 1.5 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. पण अचानक जास्मिन गायब झाल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला…

कोण आहे जास्मिन धुन्ना…

जास्मिन धुन्ना 1979 ते1990 पर्यंत बॉलिवूडमध्ये सक्रिय होती. पण चाहत्यांमध्ये असलेली तिची क्रेझ कधीच कमी झाली आहे. जास्मिन हिने वयाच्या 13 व्या वर्षी 1979 मध्ये विनोद खन्ना यांच्यासोबत ‘सरकारी मेहमान’ सिनेमातून अभिनयास सुरुवात केली. त्यानंतर जास्मिन हिने ‘तलाक’ आणि ‘विराना’ या दोनच सिनेमांमध्ये काम केलं… त्यानंतर अचानक गायब झाली. ती कुठे आहे अद्यापही कोणाला माहिती नाही.

अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालेला दाऊद इब्राहिम

जास्मिनने वयाच्या 13 व्या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आणि ती जितेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘हातिम ताई’ या सिनेमात झळकली. याव्यतिरिक्त, तिने ‘सरकारी मेहमान’ आणि ‘तलाक’ अशा केवळ दोनच सिनेमांमध्ये काम केले. मिळालेल्या माहितीनुसार, कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमशी असलेल्या संबंधांमुळे जास्मिन रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. दाऊद इब्राहिम तिच्या प्रेमात वेडा होता आणि ती जिथे जिथे जायची, तिथे तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तो आपल्या माणसांना तैनात करत असे.

अचनाक झाली झगमगत्या विश्वापासून दूर

बॉलिवूडमध्ये जास्मिन यशाच्या शिखरावर पोहोचलेली… असं देखील सांगितलं जातं की, तिने बॉलिवूडशी असलेले सर्वसंबंध मोडले. तिने नवीन सिनेमे साईन करणं देखील बंद केलं… ज्यामुळे चर्चांना उधाण आलं… जास्मिन जवळपास 37 वर्षांपासून गायब आहे. दरम्यान, 2017 मध्ये श्याम रामसे यांनी अभिनेत्रीबद्दल सांगितलं होतं. ती सध्या मुंबईतच राहत असून, आईच्या निधनानंतर तिने सिनेमात काम करणं सोडून दिलं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in