• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दीपिकाच्या सासऱ्यांना ब्रेन स्ट्रोक; तातडीने आयसीयूमध्ये दाखल, पतीची भावूक पोस्ट

May 24, 2026 by admin Leave a Comment


‘ससुराल सिमर का’ या मालिकेत सिमरची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही काळापासून सतत विविध समस्यांचा सामना करतेय. आधी तिला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर तिच्या पोटात सिस्ट आढळले. त्याचीही सर्जरी झाल्यानंतर दीपिका आता कुठे तिचं सर्वसामान्य आयुष्य जगत होती. इतक्यात तिचे सासरे आणि पती शोएब इब्राहिमचे वडील यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. याबद्दलची अपडेट शोएबने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिली आहे.

शोएबने सांगितलं की 23 मे रोजी सकाळी त्याच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक आला आणि त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. पुढील 24 तास त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचं शोएबने म्हटलंय. त्याच्या वडिलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन त्याने चाहत्यांना केलं आहे.

शोएबने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘माझ्या वडिलांना तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांची खूप गरज आहे. बाबांना आज सकाळी पुन्हा स्ट्रोक आला आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा. पुढील 24 तास खूप महत्त्वाचे आहेत.’ त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत वडिलांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणार असल्याचं सांगितलं.

शोएबची पोस्ट-

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत चर्चेतल्या जोडप्यांपैकी एक आहे. या दोघांनी मालिकांमध्ये काम करून प्रचंड लोकप्रियता कमावली आहे. लग्नानंतर दीपिकाने अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेतला असून ती युट्यूब आणि इतर सोशल मीडिया अकाऊंट्सवर प्रचंड सक्रिय असते. तर शोएबचंही स्वत:चं युट्यूब चॅनल आहे, ज्यावर विविध व्हिडीओ पोस्ट करत तो चाहत्यांना त्याच्या आयुष्यातील अपडेट्स देत असतो. त्याच्या चॅनलचे 3.27 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

‘ससुराल सिमर का’ या मालिकेत काम करताना दीपिका आणि शोएब एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दीपिकाचं हे दुसरं लग्न होतं. शोएबशी लग्नापूर्वी तिने धर्मांतर करून ‘फातिमा’ असं नाव ठेवल्याचंही म्हटलं जातं. या दोघांना एक मुलगा आहे. दीपिकाला काही महिन्यांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावरील उपचारानंतर तिच्या पोटात सिस्ट आढळले होते. गेल्या काही काळापासून ती सतत आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करतेय.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in