• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अभिषेक पोरेलला अखेर बेड्या, नेमकं काय केलं? थेट हायकोर्टाने घेतली दखल

August 11, 2026 by admin Leave a Comment

Abhishek Porel Arrested: आयपीएल स्पर्धेत नावलौकिक मिळवलेल्या अभिषेक पोरेलने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र नाव धुळीस मिळवलं आहे. त्याने केलेल्या कृत्याची दखल घेत कोलकाता हायकोर्टाने त्याला बेड्या ठोकण्याचे आदेश दिले होते. त्याच्यासोबत आणखी एका आरोपीला अटक करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर बंगाल पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या अभिषेक पोरेलवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरूणीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याने लग्नाचं आमिष दाखवत लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप सदर तरूणीने केला आहे. इतकंच काय तर त्याने व्हिडीओ बनवून धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला आहे. खासगी फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देत होता, असं तिने तक्रारीत म्हंटलं आहे. यानंतर बंगाल पोलिसांनी हुगलीतून त्याला अटक केली आहे. अभिषेक पोरेलला अटक करण्याचे आदेश 14 जुलैला दिले होते. तसेच त्याच्याकडील कथित पेन ड्राईव्ह जप्त करण्यास सांगितला होता. त्यानंतर आता त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी न्यायालयात सांगितलं की, पेन ड्राईव्ह त्याच्याकडून जप्त केला असून फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला आहे. अभिषेक पोरेलवर महिलेला ओलीस ठेवल्याचाही आरोप आहे. रिपोर्टनुसार, सदर तरूणी 2023 मध्ये पोरेलच्या संपर्कात आली होती. त्यांच्या कुटुंबियात लग्नाबाबत बोलणीही झाली होती. पण त्यानंतर त्याने नकार दिला. इतकंच काय तर 2 एप्रिल 2026 रोजी दिल्लीत तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. मात्र हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाही. दुसरीकडे, सदर तरुणीने पोलिसानाही धारेवर धरलं आहे. त्याच्यावर वेळीच कारवाई केली नाही असा आरोप केला आहे. त्यामुळे कोलकाता हायकोर्टाची पायरी चढावी लागल्याचं तिने सांगितलं. दुसरीकडे, अभिषेक पोरेलने यापूर्वी हे आरोप फेटाळून लावले होते.

#WATCH | Hooghly, West Bengal: Hooghly Rural SP Kunwar Bhushan Singh- In connection with Mogra PS Case No. 346/26, registered under Sections of BNS and Sections 66E/72 of the IT Act, the prime accused, namely Abhishek Porel (Cricketer) has been arrested from Emami City under Dum… pic.twitter.com/RR4K9vuI7G

— ANI (@ANI) August 11, 2026

आभिषेक पोरेलची क्रिकेट कारकिर्द

अभिषेक पोरेलचं क्रिकेट कारकि‍र्द आता कुठे सुरू झाली होती. पण त्याच्या या कृत्यानंतर आता त्याला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. डावखुरा विकेटकीपर फलंदाज अभिषेक पोरेल आयपीएलमध्ये 35 सामने खेळला आहे. त्याने 25.6 च्या सरासरीने 769 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने 4 अर्धशतकंही ठोकली आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बंगालसाठी 32 सामने, लिस्ट ए मध्ये 23 आणि टी20 मध्ये 61 सामने खेळला आहे. आयपीएल 2026 च्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने त्याला 4 कोटी रुपयांना संघात कायम ठेवले होते.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in