• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दिल्ली आंदोलनावरून भाजपाच्या बड्या नेत्याचा सरकारला घरचा आहेर; दिला महत्त्वाचा सल्ला!

July 23, 2026 by admin Leave a Comment


Murli Manohar Joshi : कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर मोठे आंदोलन सुरू आहे. नीटच्या परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे तसेच नीट पेपरफुटीमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ आपला राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी या आंदोलकांची आहे. दुसरीकडे राज्यातील विरोधी पक्षांनीदेखील हा मुद्दा चांगलाच लावून धरलाय. 20 जुलै रोजी झालेल्या संसद मार्चमध्ये विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्च केला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळेही संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. आता केंद्र सरकारने आमची सर्व मुद्द्यांवर चर्चेची तयारी आहे. परंतु सीजेपी तसेच इंडिया आघाडीने मात्र अगोदर धर्णेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्यानंतरच चर्चा अशी भूमिका घेतली आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आत भाजपाच्याच एका ज्येष्ठ नेत्याने भाजपाला घरचा आहेर दिला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या वागणुकीवर त्यांनी आक्षेप व्यक्त केलाय.

विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने वागणूक देण्यात आली

भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मनुष्यबळ विकास मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी सध्या सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर आक्षेप व्यक्त केलाय. तसेच विद्यार्थ्यांचे मुद्दे हे रास्त असल्याचेही परखड मत त्यांनी व्यक्त केलेय. विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने वागणूक देण्यात आली, त्यावरही मुरली मनोहर जोशी यांनी दु:ख व्यक्त केलंय. या आंदोलनाकडे फक्त कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातूनच पाहणे आयोग्य असल्याचेही ते म्हणाले आहेत.

It is painful to see young students from different parts of the country assembled for days on the streets of New Delhi. Their anxieties and concerns regarding the examination system are genuine and must be handled with empathy and a desire to find a lasting solution. I fervently…

— Dr. Murli Manohar Joshi (@DrMurliManohar_) July 23, 2026

मुरली मनोहर जोशी यांच्या ट्वीटमध्ये नेमकं काय आहे?

गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध भागातून दिल्लीच्या रस्त्यांवर विद्यार्थी जमा झालेले आहेत. हे चित्र अत्यंत वेदनादायी आहे. विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात असलेली चिंता ही रास्त आणि वास्तवाला धरून आहे. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांकडे सहानुभूतीने पाहिले पाहिजे, अशी अशा त्यांनी व्यक्त केली. तसेच तरुणांनी उपस्थित केलेल्या पश्नाना दूरगामी समाधानाच्या दृष्टीने सोडवले पाहिजे. बळाचा वापर करण्याच्या दृष्टीने सध्याच्या घटनेकडे फक्त कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या म्हणून पाहिले जाणार नाही, अशी मला आशा आहे, असंही ते म्हणाले. महिला तसेच तरुणींवरही बळाचा वापर केला गेला, हे खूपच वेदनादायी आहे. अशा बळाच्या वापरामुळे भारताचा एक मोठा हिस्सा विकसित भारताच्या लक्ष्यापासून खूप दूर जाऊ शकतो, असा इशाराही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in