• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दिल्लीत पेपरफुटीच्या विरोधात शेकडो भाजप कार्यकर्ते रस्त्यावर; थेट शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

July 30, 2026 by admin Leave a Comment


नवी दिल्ली पुन्हा आंदोलनामुळे चर्चेत आली आहे. कॉक्रोच जनता पार्टीनंतर आता भाजपचे कार्यकर्ते पेपरफुटीच्या विरोधात आक्रमक झाली आहे. भाजपचे शेकडो कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर घेऊन पंजाब सरकारमधील शिक्षणमंत्र्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पंजाबमधील फार्मसीचा पेपर फुटल्याचा आरोप करत भाजपचे कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपच्या दिल्ली कार्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे. पंजाबमध्ये 19 जुलै रोजी फार्मसीचा पेपर फुटल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. हातात पोस्टर घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. पंजाब सरकारच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केल्या जात आहेत. अरविंद केजरीवाल यांनी लाज बाळगवी, अशी टीका भाजप कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. सर्व कार्यकर्ते दिल्लीच्या फिरोज शहा रस्त्यावर पोहोचले आहेत. या रस्त्यापासून 200 ते 300 मीटर अंतरावर आम आदमी पक्षाचे कार्यालय आहे. मात्र, पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीच्या भाजप प्रदेशाध्यक्षाच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. तसेच आंदोलकांवर कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज करून नये, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

 

पंजाब में पेपर लीक के विरोध में प्रदेश अध्यक्ष श्री हर्ष मल्होत्रा जी के नेतृत्व में दिल्ली भाजपा का आम आदमी पार्टी के खिलाफ प्रचंड प्रदर्शन

पंजाब के शिक्षा मंत्री इस्तीफा दो ! pic.twitter.com/Yrhxh0T2kL

— BJP Delhi (@BJP4Delhi) July 30, 2026

पंजाबमध्ये नोकर भरती आणि इतर पक्षांमध्ये कथित गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून भाजपने आम आदमी पक्षाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी मंगळवारी गंभीर आरोप केला. ‘मागील पाच वर्षांत पंजाबमध्ये सहा मोठ्या पेपपफुटी झाल्या आहेत. या कारभारात ‘आप’ सरकार अपयशी ठरलं आहे.

स्वाती मालीवाल यांनी काय आरोप केला होता?

‘गेल्या पाच वर्षांत पंजाबमध्ये सहा मोठ्या पेपरफुटी झाल्या आहेत. परीक्षांमध्ये कॉपीची प्रकरणेही उघडकीस आली होती. काही दिवसांपूर्वी 19 जुलै रोजी झालेल्या फार्मसीच्या परीक्षेती कॉपी झाली होती. यात ‘पंजाबमध्ये ‘सुपर सीएम’ म्हणून काम करणाऱ्या केजरीवाल यांनी या विषयावर मौन बाळगलं आहे. त्यात पंजाबचे बेजबाबदार विधाने करत आहेत’. तसेच त्यांनी पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोत सिंग बैन्स यांनी राजीनामा द्यावा, अशी देखील मागणी केली.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in