• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दिल्लीतून फोनवर बोलणं झालं अन्…पक्षबदलावर ओमराजेंची सर्वात मोठी माहिती; ईनसाईड स्टोरी समोर!

June 21, 2026 by admin Leave a Comment


Omraje Nimbalkar Joins Shiv Sena : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. वडिलांच्या हत्येचा निकाल विरोधात लागल्यानंतर त्यांनी मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षबदलाचा निर्णय घेईल, असे ओमराजे यांनी सांगितले होते. दरम्यान, आपल्या वडिलांची हत्या आणि न्यायालयाचा निकाल यावर भाष्य करताना ओमराजे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्याशी फोनवर बोलणं झाल्याचं सांगितलं.

राजे साहेब गेले तसंच दुख:..

धाराशिवमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबतची बैठक संपल्यानंतर ओमाराजे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याचे जाहीर केले. यावेळी बोलताना कळंबोली पोलीस स्टेशनचा बेस करून निकाल आला. राजे साहेब गेले तसंच दुख: आम्हाला काल सहन करावं लागलं. यामध्ये एक माणूस सक्षमपणे आमच्या पाठी होता. त्यांनाही ते पटलं नव्हतं. काल ज्या पद्धतीने निकाल आला. फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत बोलणं झालं, असं ओमराजे यांनी यावेळी सांगितले.

पण आम्ही २० वर्षापासून संघर्ष करतो

तसेच, अमित शाहांसोबत बोलणं झाल्याचं सांगताना, “फडणवीस आणि शिंदे यांनी अमित शाहांसोबत बोलणं करून दिलं. आम्ही विनंती केली की, साहेब आम्हाला फेवर नको. पण आम्ही २० वर्षापासून संघर्ष करतो. न्याय मागतो, तो न्याय मिळवून द्यावा. शिंदे यांनी समोर येऊन स्टेटमेंट दिलं. सीबीआय या प्रकरणात अपील दाखल करणार आहे. केसच्या मेरिटवर ज्या ठिकाणी न्याय डावलला गेला तो आम्हाला मिळावा,” असे ओमराजे म्हणाले.

शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही चांगलं काम करू

सामान्य माणूस ओमराजेंना ओळखत आहे. २००६ पासून मी सामान्य माणसासाठी काम करत आहे. पैसा आणि पदासाठी जाणारा ओमराजे नाही. माझ्याकडे मोठे प्रस्थापित माणसं कोणी नाही. सामान्य माणसं माझ्याकडे आशा लावून पाहत आहे. सत्तेचा वापर मी सर्वसामान्यांच्या जीवनात देण्यासाठी करत राहील. ज्या पद्धतीने धावून जाऊन काम करण्याचा शिंदे यांचा स्वभाव आहे. ते निश्चितपणे धावून येतील. आमचं वैयक्तीक कोणतं काम नाही. वेगळा व्यवसाय माझा आहे आणि त्यासाठी संरक्षण मला घ्यायचं आहे, असं नहाी. माझ्यावर ईडी सीबीआयची धाड पडली असं नाही. मी सामान्य कार्यकर्ता आहे. शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही चांगलं काम करू, असे आश्वानसही त्यांनी यावेळी जनतेला दिले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PF मधून आज काढले 1 लाख तर निवृत्तीनंतर 11 लाखाचे नुकसान?, एक्सपर्टने समजावले गणित
  • ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
  • संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’च्या सेटवर घडला मोठा अनर्थ; शूटिंगदरम्यान तंत्रज्ञाचा मृत्यू
  • 6 खासदारांचा पक्षप्रवेश होताच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, प्रश्न सोडवण्यासाठी घेतला मोठा निर्णय
  • Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in