
इराण आणि अमेरिका युद्धात भारत अॅक्शन मोडवर आहे. दाऊद इब्राहिम भारताकडून अत्यंत मोठा दणका देण्यात आला. दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याचे सांगितले जाते. भारतातून पळून तो पाकिस्तानमध्ये लपून बसला आहे. आता पाकिस्तानमध्ये बसलेल्या दाऊद इब्राहिमला मोठा झटका भारत सरकारने दिला. दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार सलीम डोला याला भारतात आणण्यात मोठे यश मिळाले. सलीम डोला हा दाऊद इब्राहिम याचा अत्यंत जवळचा मानला जातो. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला सातसमुद्रपार करून भारतात आणण्यात आले. गुप्तचर विभागाने आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने ही कारवाई केली. दिल्लीतील विमानतळावरून त्याला आता चाैकशीसाठी नेण्यात आले. गुप्तचर यंत्रणा डोलाची चाैकशी करत असल्याची माहिती आहे. सलीम डोला याला भारतात आणणे म्हणजे हा भारताचा अत्यंत मोठा विजय मानला जात आहे.
सलीम डोला याला भारतात आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते. आज सकाळीच त्याला विशेष विमानाने आणल्याचे कळतंय. विशेष म्हणजे गुप्तचर विभागाच्या चाैकशीनंतर सलीम डोला याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. डोला याला इस्तंबूलमध्ये अटक करण्यात आली होती. आज सकाळी इस्तंबूलहून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले. ज्यासाठी एक यंत्रणा काम करत होती.
मुंबईच्या गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या तस्करीत प्रमुख सलीम डोला आहे. ज्याचा शोधात भारत सरकार होते. अखेर त्याला पकडण्यात यश मिळाले. छोटा शकीलने सुरुवातीला त्याच्यावर मुंबई आणि आसपासच्या परिसरात गांजा पुरवण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील भारताबाहेर पळून गेले.
सलीम डोला भारतातच राहिला आणि डी कंपनीसाठी अमली पदार्थांचे नेटवर्क सांभाळत होता. त्यानंतर तो दाऊद इब्राहिमच्या अत्यंत जवळ पोहोचला. भारतात गुन्हेगारी कारवाई त्याने घडवून आणल्या. त्यानंतर त्यानेही भारतातून पळ काढला. अखेर त्याला भारतात आणण्यात मोठे यश यंत्रणांना मिळाले. आता त्याच्याकडून मोठी माहिती मिळू शकते. हा दाऊद इब्राहिम याच्याकरिता अत्यंत मोठा धकका नक्कीच म्हणाला लागेल.
Leave a Reply