• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दहीहंडीमधील डान्समुळे राधा पाटील अडचणीत, गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

September 7, 2026 by admin Leave a Comment


दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात लावणी सादर करताना अश्लील नृत्य होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्यासह दहीहंडी मंडळाचे अध्यक्ष आणि आयोजकाविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कलाकारांकडून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे आवश्यक प्रमाणपत्र सादर करण्यात आले नसल्याने पोलिसांनी कार्यक्रमास परवानगी नाकारली होती. त्यानंतरही कार्यक्रम घेण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी लावणी नृत्यांगणा राधा पाटील, एम्पायर ग्रुप ए. के. बॉइजचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे आणि आयोजक अमोल काटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या निदर्शनास आलेल्या गोष्टी

मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह लावणीचे सादरीकरण करण्यात येणार होते. कार्यक्रमादरम्यान अश्लील अथवा आक्षेपार्ह नृत्य सादर होऊ नये, यासाठी प्रशासनाने संबंधित आयोजकांना काही अटी घातल्या होत्या. त्यामध्ये कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करणे ही महत्त्वाची अट होती.

या अटींची पूर्तता करण्यासाठी आयोजकांकडे आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांची मागणी करण्यात आली होती. मात्र, मंडळाचे अध्यक्ष, आयोजक तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करणाऱ्या लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्राधिकृत कागदपत्रे किंवा आवश्यक प्रमाणपत्र सादर करण्यात आले नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

त्यामुळे बिबवेवाडी पोलिसांनी संबंधित दहीहंडी कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. कार्यक्रमासाठी परवानगी नसतानाही तो आयोजित करून त्यात लावणीचे सादरीकरण करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी राधा पाटील, मंडळाचे अध्यक्ष भूषण सोनवणे आणि आयोजक अमोल काटे यांच्याविरोधात कारवाई केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika Patil (@radha_mumbaikar_)

सार्वजनिक उत्सवांसाठी नियम काय?

दहीहंडी, गणेशोत्सव आणि इतर सार्वजनिक उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कार्यक्रमांचे आयोजन करताना प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली अश्लील किंवा आक्षेपार्ह नृत्यप्रकार सादर होऊ नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांकडून आवश्यक परवानग्या आणि प्रमाणपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या जातात.

या पार्श्वभूमीवर परवानगी नाकारण्यात आलेल्या कार्यक्रमाचे आयोजन नेमके कोणत्या परिस्थितीत करण्यात आले, तसेच कार्यक्रमादरम्यान प्रत्यक्षात कोणते सादरीकरण झाले, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. संबंधित आयोजक आणि कलाकारांकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 40 चोरांमध्ये जीनत अमानचा डान्स, पाहून सर्वांनीच धरला होता ठेका, 46 वर्षांपासून गाणं सुपरहिट
  • Bigg Boss 20 : एकेकाळी हॉटेलमध्ये वेटर, सैफ-करीनाच्या लग्नात घासली भांडी; आज ‘या’ अभिनेत्याची सलमानच्या शोमध्ये एन्ट्री
  • Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट…
  • Feng Shui : या चार वस्तू घरात ठेवा; होईल धनाचा वर्षाव, नशीबच बदलून जाईल
  • Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in