
राज्यात डिजेबंदीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यात प्रथम डिजेबंदीची मागणी केल्यानंतर आता राज्यातील विविध जिल्ह्यात पसरू लागली आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरात डीजेबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता इतरही जिल्ह्यात मागणी केली जात आहे. त्यात दहीहंडीत काही आयोजकांच्या स्टेजवर महिला नाचल्या होत्या. त्यावरून जोरदार टीका होत आहे. यावरून थेट शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
संभाजी भिंडे यांनी टाकळीतून माध्यमांशी संवाद साधला. संभाजी भिडे म्हणाले, ‘डीजे आणि डॉल्बी फेकून दिली पाहिजे. त्याचा काय फायदा, त्यातून देशाला काय मिळते. काही गोष्टी टाळल्या पाहिजे, त्यात डॉल्बी आहे. सणामध्ये अश्लील डान्स करणारे बायका नाचवणे, असले प्रकार करणारे मुर्ख आहे. देशद्रोही आहेत. हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजले नाही पाहिजेत, डॉल्बी फेकून दिले पाहिजेत. दहीहंडी सणांमध्ये बायका नाचवणारे देशद्रोही आहेत. चुकीचं काम त्यांनी केलं आहे.
सैनिक टाकळीमध्ये होऊ घातलेल्या MIDC ला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी विरोध दर्शवला. ते म्हणाले, या एमआयडीसीला पाठिंबा म्हणजे पाकिस्तानला पाठिंबा आहे. जमत नाही. देशासाठी जगणारी जात ही मराठा जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. मी बोलत नाही हे लोकांच मत आहे. ते कोणीही असोत. सैनिक टाकळीला सैनिकी पेशाची आग आहे, ती वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आम्हाला एमआयडी नको. भारत मातेच्या कपाळावरील स्वातंत्र्याचं कुंकू टिकवण्यासाठी जगणारी जात म्हणजे सैनिक. हिंदूस्थानचे भूषण हे गाव आहे. हा देश स्वातंत्र्य होताना चौदा तुकडे बाजूला गेले. ते पुन्हा एकत्र आणू. अखंड हिंदूस्थान निर्माण करण्याची आग असणारी लोक आहेत’.
Leave a Reply