• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

थोडं थांबा ब्रेकिंग न्यूज मिळेल, ओमराजेंच्या पक्षप्रवेशावर एकनाथ शिंदेंचे सर्वात मोठे विधान; आता लवकरच….

June 21, 2026 by admin Leave a Comment


Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदार फुटले आहेत. यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचेदेखील नाव आहे. परंतु वडिलांच्या हत्येचा निकाल विरोधात गेल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी मी माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिंदे गटात सामील व्हायचे की नाही, हे ठरवणार आहे, अशी भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ओमराजे यांच्या भूमिकेकडे लागले आहे. ओमराजे यांना पक्षात सामील करून घेण्याची तसेच ओमराजेंचे मन वळवण्याची जबाबादारी आमदार तानाजी सावंत यांच्यावर सोपवलेली आहे. ते सध्या धाराशिवमध्ये आहेत. दरम्यान, इकडे मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर आणि ओमराजे यांच्या पक्षप्रवेशावर सर्वात मोठं विधान केलं आहे. त्यांच्या सूचक विधानानंतर आता ओमराजे लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार, असे म्हटले जात आहे.

शिवीगाळ करणं, आरोप करणं चुकीचं आहे

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आणि काही प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना त्यांनी ओमराजे यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य केले. काल पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा खटला कोर्टात निर्णयासाठी होता. त्यांचं कुटुंब वेगळ्या दुखात होतं. अशा संवेदनशील परिस्थितीत त्यांना शिवीगाळ करणं, आरोप करणं चुकीचं आहे, असे मत यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

थांबा ब्रेकिंग न्यूज मिळेल

तसेच, ते ठाकरे गटात होते तेव्हा त्यांना जमिनीवरचा कार्यकर्ता म्हटलं जात होतं. आता त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यांना रिलस्टार म्हटलं जात आहे, अशी टीका शिंदे यांनी केली. तसेच सकाळी आरोप करतात, खासदारांना शिव्या देतात, रात्री गुपचूप जाऊन त्यांचे पाय धरतात. हा खरा म्हणजे केमिल लोचा आहे, अशी टीका त्यांनी ठाकरे गटावर केली. तसेच जी काही चर्चा सुरू आहे, ती खोटी आहे. आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट करत नाही. तुम्हाला थोडं थांबा ब्रेकिंग न्यूज मिळेल, असं सूचक विधानही त्यांनी केलं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijeet Dipke : सीजेपीमध्ये मोठा उलटफेर, अभिजीत दीपकेंचा निर्णय काय? कुणाला दिली कोणती पदं?
  • MPSC पेपर फुटीच्या मुद्यावर मनसेने विचारला एकदम रास्त, पटण्यासारखा प्रश्न, विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना
  • महाराष्ट्रात भाजमध्ये मोठी उलथपालथ; पक्षातील 37 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, कोणाला कोणतं पद मिळालं?
  • मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा
  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in