• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

थायरॉईडचा तरुणांनाच नाही तर, लहान मुलांवरही होतोय परिणाम, पालकांनो ‘या’ लक्षणांकडे नका करु दुर्लक्ष

July 31, 2026 by admin Leave a Comment


‘थायरॉईड’ हा आजच्या काळात एक सामान्य आजार झाला आहे. 100 पैकी 95 लोकांना ‘थायरॉईड’ हा आजार आहे. हा एक असा आजार आहे ज्यामुळे व्यक्तीचे वजन झपाट्याने कमी किंवा वाढतं. एकदा हा आजार झाला की, तो नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात असं देखील म्हटलं जातं. आणखी एक गैरसमज असा आहे की हा आजार फक्त तरुणांनाच होतो. पण जर तुमच्या मुलांचं वजन झपाट्याने वाढत असेल किंवा कमी होत असेल, तर पालकांनी त्यांच्या थायरॉईडची तपासणी करून घ्यावी.

थायरॉईडबद्दल बोलताना डॉ. प्रिया म्हणाल्या, “बऱ्याच लोकांना वाटतं की थायरॉईडचा त्रास फक्त तरुणांना होतो. पण लहान मुलांनाही थायरॉईडचा त्रास होऊ शकतो, विशेषतः हायपोथायरॉईडीझमचा. याचा अर्थ असा की, थायरॉईड ग्रंथी पुरेशा प्रमाणात थायरॉईड हार्मोन्स तयार करत नाही. हे हार्मोन्स मुलांमध्ये योग्य वाढ, मेंदूचा विकास आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असतात.”

पालकांनी या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष… 

सर्वप्रथम, जर तुमच्या मुलाची उंची किंवा शारीरिक विकास त्याच्या वयाच्या मानाने मंद असेल, किंवा त्याला पौगंडावस्था उशिरा येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. फक्त मुलींना नाही तर, मुलांना देखील थायरॉईड होऊ शकतो.

दुसरी गोष्ट म्हणजे, पुरेशी झोप घेऊनही जर तुमचे मूल सतत थकलेले असेल, तर त्याला केवळ आळस समजून दुर्लक्ष करू नका.

तिसरे, जर एखाद्या मुलाला शाळेत लक्ष केंद्रित करण्यास अडचण येत असेल, गोष्टी लक्षात ठेवण्यात त्रास होत असेल किंवा त्याच्या शालेय कामगिरीत अचानक घट दिसू लागली असेल, तर त्याचं कारण थायरॉईडची समस्या असू शकते.

वजन वाढणे आणि बद्धकोष्ठता हे देखील एक लक्षण असू शकते, कारण थायरॉईड ग्रंथीच्या कमी कार्यामुळे चयापचय आणि पचनक्रिया दोन्ही मंदावतात.

जर तुमच्या मुलाला इतर मुलांपेक्षा जास्त थंडी जाणवत असेल, त्याची त्वचा खूप कोरडी असेल किंवा त्याच्या मानेच्या पुढच्या भागात सूज असेल, तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

चांगली बातमी ही आहे की थायरॉईडच्या आजारावर उपचार शक्य आहेत. त्यामुळे, जर तुम्हाला एकाच वेळी यापैकी अनेक लक्षणे दिसली, तर तुमच्या मुलाला नक्कीच बालरोगतज्ञाकडे घेऊन जा. एका साध्या रक्त तपासणीद्वारे याचं निदान होऊ शकतं. वेळेवर उपचार केल्यास मुलाची वाढ आणि विकास सामान्य राहील.

 

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेनंतर कांदाही महागला, पण या App वर मिळतोय सर्वात स्वस्त कांदा, 1 किलोची किंमत फक्त…
  • Sachin Ahir : ‘हिम्मत कशी होते? यापुढच्या काळात..’ माझगावमध्ये गणेश मिरवणुकीवर अंड फेकण्याच्या घटनेवर सचिन अहिर यांचं रोखठोक भाष्य
  • तीन दिवसानंतर काय होणार? नवं संकट डोक्यावर? हवामान खात्याचा अंदाज काय?
  • Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
  • लाखो चाहत्यांची क्रश, हानिया आमिरच्या त्या व्हिडीओमुळे एकच खळबळ, चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in