• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

थलपती विजय यांच्या शेवटच्या सिनेमाला अखेर मिळालं सर्टिफिकेट; ‘जन नायकन’मध्ये 12 कट्स, पक्षाचं नावच हटवलं

July 10, 2026 by admin Leave a Comment


असंख्य अडथळ्यांनंतर अखेर थलपती विजय यांच्या ‘जन नायकन’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट 9 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र नंतर त्याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकण्यात आली होती. अद्याप निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नेमकी तारीख जाहीर केली नसली तरी जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत हा मोठ्या पडद्यावर येऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देताना या चित्रपटात एकूण 12 कट्स सुचवल्याचंही कळतंय. सेन्सॉर बोर्डाने ‘जन नायकन’ला ‘A’ प्रमाणपत्र दिलं आहे. हा चित्रपट एकूण 183 मिनिटं म्हणजेच 3 तास 3 मिनिटं आणि 11 सेकंदांचा आहे.

सेन्सॉर बोर्डाने ‘जन नायकन’ या चित्रपटातून काही डायलॉग काढून टाकण्याच्या, काही शब्दांना म्यूट करण्याचा आणि काही दृश्ये बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भीमराव आंबेडकर यांचा फोटो असलेल्या पुस्तकाच्या कवरशी संबंधित दृश्यात बदल करण्यात आला आहे. तर ‘आंबेडकर.. टू.. टीव्हीके सत्तम’ हा डायलॉग काढून टाकण्यात आला आहे. याशिवाय जिथे जिथे ‘टीव्हीके’ हा शब्द आहे, तिथे ऑडिओ आणि व्हिडीओ या दोघांमध्ये बदल करण्याचे आणि म्यूट करण्याचे निर्देश दिले आहेत.

सेन्सॉर बोर्डाने एका अशाही सीनला हटवण्यास सांगितलं आहे, ज्यामध्ये भारताचा तिरंगा दिसत आहे. याशिवाय ‘भगवतन’, ‘रंगनाथर’, ‘थेविदिया पैया’ आणि ‘ओत्था’ यांसारख्या शब्दांना म्यूट करण्यात आलं आहे. चित्रपटातील आणखी एका दृश्यात ऑपरेशन मेलुहाच्या डिटेलिंगदरम्यान वापरण्यात आलेल्या ‘ओम’ या शब्दालाही हटवण्याचे निर्देश दिले आहेत. तर सद्दाम हुसैनच्या फाशीचा उल्लेख करणाऱ्या डायलॉगमध्ये बदल करण्यास किंवा तो म्यूट करण्यास सांगण्यात आलं आहे. सेन्सॉर बोर्डाने जिल्हाधिकारी कार्यालयाचा बिल्ला अपमानास्पद रीतीने खाली उतरवण्याचं दृश्य पूर्णपणे काढून टाकून त्याऐवजी दुसरं दृश्य समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. ‘पोन्नोडा.. कुदुथु वचिरुक्कनु, उदंबु एरुक्कनु’ इथून सुरू होणारा संपूर्ण डायलॉगसुद्धा म्यूट करण्यास सांगितलं आहे.

चित्रपटातील ‘इंडिया एन कल्ला विझा वैकरेन’वाला डायलॉगसुद्धा म्यूट करण्यात आला आहे. एका लहान मुलाला जाळण्याचा सीन हटवून त्याजागी नवीन सीन जोडण्यात आला आहे. तर ‘सिलुवैला’ शब्दसुद्धा म्यूट करण्यात आला आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात जिथे कुठे ‘शीला राणी’ हे नाव दिसत असेल, त्याला बदलण्याचेही निर्देश दिले आहेत. बोर्डाच्या आदेशानंतर जवळपास 20 सेकंदांचा फुटेजसुद्धा काढून टाकण्यात आला आहे. त्याजागी जवळपास दहा सेकंदांचे नवे सीन्स जोडण्यात आले आहेत.

‘जन नायकन’ या चित्रपटात थलपती विजय यांच्यासोबत पूजा हेगडे, बॉबी देओल आणि मामिता बैजू यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विजय यांचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अत्यंत आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल
  • मुंबई पोलिसांचा मोठा दणका! तब्बल 3 दशकं चकवा देणारे दोन अट्टल गुन्हेगार गजाआड
  • Asian Games: भारत पाकिस्तान यांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, नेमकं काय झालं? वेळापत्रक समजून घ्या
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in