• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

थलपती विजय यांच्यासाठी खुशखबर? आणखी एका आमदाराचा राजीनामा; विधानसभेत बदलणार संपूर्ण गणित

June 29, 2026 by admin Leave a Comment


तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एआयएडीएमकेच्या (AIADMK) अडचणी सतत वाढताना दिसत आहेत. तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) हा पक्ष सत्तेत आल्यानंतर आणि थलपती विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर एआयएडीएमकेच्या आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. माजी परिवहन मंत्री एम. आर. विजयभास्कर यांनी एआयएडीएमके पक्षाचा राजीनामा दिला आहे. राज्याच्या निवडणुकांनंतर पक्ष सोडणारे ते सहावे आमदार ठरले आहेत. यामुळे पक्षप्रमुख पलानीस्वामी यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. करूरचे आमदार असलेल्या विजयभास्कर यांनी आज (सोमवार) सकाळी राज्य सचिवालयात सभापती जे. सी. डी. प्रभाकर यांची भेट घेऊन आपला राजीनामा दिला. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आधीच विधानसभेत एआयएडीएमके पक्ष तिसऱ्या स्थानावर ढकलला गेला आहे. आता पक्षातील वाढत्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड समोर आली आहे.

टीव्हीकेमध्ये होणार सामील?

यापूर्वी एआयएडीएमकेच्या चार आमदारांनी राजीनामा देऊन सत्ताधारी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला होता. यामुळे विरोधी पक्षांची ताकद कमकुवत झाली होती. आता विजयभास्करसुद्धा मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षात सामील होऊ शकतात, अशी जोरदार चर्चा आहे. एम. आर. विजयभास्कर यांनी जे. जयललिता यांच्या मंत्रिमंडळात परिवहन मंत्री म्हणून काम पाहिलं होतं. 2021 च्या निवडणुकीत ते करूरमधून डीएमकेचे व्ही. सेंथिल बालाजी यांच्याकडून पराभूत झाले होते. परंतु यावर्षीच्या निवडणुकांमध्ये ते तिथून पुन्हा निवडून आले.

पोटनिवडणुकीची तयारी

सहाव्या आमदाराच्या राजीनाम्यामुळे तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या सात जागा रिक्त झाल्या आहेत. त्यापैकी एक विजय यांनी सोडलेली त्रिची पूर्वची जागा आहे. विजय यांनी पेरांबूर आणि त्रिची पूर्व या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती आणि या दोन्ही ठिकाणी त्यांचा विजय झाला होता. मात्र नियमानुसार त्यांना एक जागा सोडावी लागली. तेव्हा त्यांनी पेरांबूर मतदारसंघातील जागा ठेवली. त्यामुळे त्रिची पूर्वची जागा रिक्त झाली आहे. यामुळे आता आगामी विधानसभा पोटनिवडणुकांच्या तयारीला तमिळनाडूमध्ये वेग आला आहे. एआयएडीएमकेनं 1 जुलै रोजी त्यांच्या महिला शाखेची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..
  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in