• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

थलपती विजय पत्नीशी करणार तडजोड? कोर्टात सुनावणीपूर्वी बंद दाराआड चर्चा, मध्यस्थीसाठी आईचा पुढाकार

June 15, 2026 by admin Leave a Comment


तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते मुख्यमंत्री बनण्याआधी त्यांची पत्नी संगीता सोरनालिंगमने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जात संगीताने विजय यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या नात्याने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता विजय आणि संगीता हे पुन्हा एकदा त्यांच्या नात्यात मार्ग काढणार असल्याचं कळतंय. त्यांच्या घटस्फोटाच्या खटल्याची महत्त्वाची सुनावणी आज (15 जून) होणार आहे. ताज्या माहितीनुसार, हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्यासाठी या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. या सुनावणीसाठी संगीता लंडनहून चेन्नईला परतल्याचंही कळतंय.

थलपती विजय यांच्या आई शोभा चंद्रशेखर या दोघांमध्ये मध्यस्थी करत असल्याचंही समजतंय. विजय आणि संगीता यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी शोभा त्यांच्यात संवादाला प्रोत्साहत देत असल्याचं वृत्त आहे. इतकंच नव्हे तर 22 जून रोजी विजय यांच्या वाढदिवशी याविषयी महत्त्वाची घोषणा करण्यात येणार असल्याचंही म्हटलं जात आहे. संगीता गेल्या काही दिवसांपासून मुलं संजय आणि दिव्या साशा यांच्यासोबत लंडनमध्ये राहत होती. आता ती चेन्नईला परतली आहे. चेन्नईत आल्यानंतर विजय आणि संगीता यांच्या बंद दाराआड चर्चा झाल्याचंही कळतंय.

मुख्यमंत्री विजय यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव कोर्टात दोन्ही पक्षांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार आहे. काही वृत्तांनुसार, विजय आणि संगीता यांनी या वादातून मार्ग काढल्याचंही कळतंय. त्यामुळे न्यायालयाबाहेर तडजोडीचा विचार केला जात असल्याचीही चर्चा आहे. घटस्फोटाची मूळ याचिका फेब्रुवारी 2026 मध्ये विशेष विवाह कायद्यांतर्गत दाखल करण्यात आली होती. चेंगलपट्टू कुटुंब न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत असा दावा करण्यात आला होता की, हे जोडपं वेगळं राहत होतं. मात्र आता दोन्ही पक्ष हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्यास तयार असल्याची माहिती समोर येत आहे.

विजय यांच्या राजकीय प्रचारासह आणि मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यासारख्या अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये संगीता आणि मुलांची अनुपस्थिती होती. परंतु विजय किंवा संगीता यांनी याप्रकरणी सार्वजनिकरित्या कोणतंही भाष्य केलं नाही. संगीता ही लंडनमध्ये राहणाऱ्या एका श्रीलंकन तमिळ कुटुंबातील आहे. तिने ऑगस्ट 1999 मध्ये विजय यांच्याशी लग्न केलं. या दोघांना जेसन संजय आणि दिव्या साशा ही दोन मुलं आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2004 कॉल्स… 238 तास गप्पा… चेतनच्या प्रेमात अखंड बुडाली होती सिया.. केतन अग्रवाल हत्याकांडात तो एक धाग ठरला महत्त्वाचा
  • अखेर इराण झुकला… अमेरिकेची ती अट मान्य, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ
  • जवळ असतील हे गुण तर तिजोरी जाईल भरून, श्रीमंती घेईल पायाशी लोळण, चाणक्य नीती काय सांगते?
  • दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर अडचणीत, तरूणीने गंभीर आरोप करत पोलिसात नोंदवली तक्रार
  • Lavender Marriage: अरेंज, लव्ह नंतर हा लॅव्हेंडर मॅरेज काय प्रकार आहे ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in