• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

त्यांच्या नादी नका लागू, ते पुढचं जनरेशन…, जेन झी बद्दल तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?

August 8, 2026 by admin Leave a Comment


एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचं राज्यभरात कौतुक होत आहे. त्यांनी एफडीएचा पदभार स्विकारल्यानंतर अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. एफडीएकडून आता थेट अशा विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली जात आहे. दरम्यान आज तुकाराम मुंढे याची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली आहेत. यावेळी त्यांना जेन झी बद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला होता, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांच्या नादी नका लागू. ते पुढचं जनरेशन आहे, असं यावेळी तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी तरुणांना देखील सल्ला दिला आहे.

नेमकं काय म्हणाले मुंढे? 

तरुणाईला मार्गदर्शन करताना मुंढे म्हणाले, ‘फक्त यशाकडे पाहू नका, तर अपयशातूनही शिकण्याचा प्रयत्न करा. कोणाचे अंधानुकरण करू नका, तर प्रत्येकाकडून चांगले गुण शिका आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. डिजिटल युगात तरुण पिढीचा ‘अटेंशन स्पॅन’ अवघ्या आठ सेकंदाचा झाला आहे आणि स्क्रीन टाइम ८-९ तासांवर गेला आहे. त्यामुळे केवळ सोशल मीडियावर रील्स स्क्रोल करू नका, तर विचार करा. कष्टाची तयारी ठेवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. प्रवाहातील लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे वाहून न जाता जिवंत माणसाप्रमाणे ध्येयाकडे वाटचाल करा. परिस्थिती कशीही असली, तरी तुमचे भविष्य हे तुम्ही आज घेतलेल्या निर्णयांवरच अवलंबून असते.’ असा सल्ला यावेळी तुकाराम मुंढे यांनी तरुणांना दिला आहे. ‘प्रत्येक तरुणाने स्वतःची स्वप्ने, सद्विवेक आणि अंतरात्म्याला ‘फॉलो’ केले पाहिजे. केवळ प्रवाहासमवेत न वाहता समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे प्रयत्न केले पाहिजेत,’ असंही यावेळी मुंढे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान वारंवार होणाऱ्या बदल्यांचा त्रास होत नाही का? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की,  वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे मला त्रास होत नाही . उलट बदल हा प्रगतीचा अविभाज्य भाग असून, माझ्या जितक्या जास्त बदल्या होतील, तितके अधिक सकारात्मक बदल घडतील,’ अशी रोखठोक भूमिका तुकाराम मुंढे यांनी मांडली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हृदय निरोगी ठेवायचं असेल तर आजच किचनमध्ये ‘या’ 5 आरोग्यदायी तेलांचा करा समावेश
  • Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला चंद्रग्रहण, राखी नेमकी कधी बांधायची ?
  • किती रोमँटिक दिसतेय.., अभिनेत्रीच्या लाल ड्रेसमधील फोटोंवर चाहते फिदा, सौंदर्य पाहून…
  • Onion Price Hike : मोठी बातमी, कांदा झाला स्वस्त, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; किती किलोने मिळणार कांदा?
  • IND vs SL: दुसऱ्या कसोटीत जयस्वाल-फर्नांडोनंतर आणखी एका खेळाडूवर कारवाई, आयसीसीकडून शिक्षा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in