• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ते नसताना जे दु:ख..; वडील धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावूक झाला बॉबी देओल

May 23, 2026 by admin Leave a Comment


अभिनेते शेखर सुमन यांनी पुन्हा एकदा मनमोकळ्या आणि भावनिक मुलाखतींसाठी नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘शेखर टुनाइट’ या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पाहुणे म्हणून पोहोचले. त्यानंतर आता दुसरा भागही तितकाच खास असणार आहे. या भागात अभिनेता बॉबी देओल खास पाहुणा म्हणून सहभागी झाला आहे. ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर मिळालेल्या प्रचंड यशामुळे सध्या बॉबी देओल चर्चेत आहेत. मात्र या भागात प्रेक्षकांना त्याचा एक अतिशय भावूक आणि हळवा पैलू पाहायला मिळणार आहे. आपल्या वडिलांबद्दल आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आठवणी सांगताना बॉबी भावूक झाला.

कार्यक्रमातील एका भावनिक क्षणी बॉबी देओलने सांगितलं, “माझ्या वडिलांवर संपूर्ण जग प्रेम करत होतं. हे मला नेहमीच माहिती होतं. पण ते आपल्यात नसताना जे दुःख आणि पोकळी निर्माण झाली, ती फक्त आमच्या कुटुंबानेच नाही तर जगभरातील चाहत्यांनीही अनुभवली. आजही मी कुठेही गेलो तरी लोक धर्मेंद्रजींची आठवण काढताना भावूक होतात. ते खूप खास व्यक्ती होते आणि त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.” यानंतर शेखर सुमन यांनी जेव्हा बॉबीला विचारलं की, वडिलांची कोणती गोष्ट तुला सर्वात जास्त आठवेल? तेव्हा बॉबी पुन्हा भावूक होत म्हणतो, “अशी एकच गोष्ट सांगणं कठीण आहे, कारण त्यांची प्रत्येक गोष्ट खास होती. त्यांचा रागसुद्धा प्रेमासारखाच वाटायचा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shekhar Tonite (@shekhartonite)

भावनिक संवादांसोबतच या भागात काही हलकेफुलके आणि मनाला भिडणारे क्षणही पाहायला मिळणार आहेत. शेखर सुमन गंमतीत बॉबीला विचारतो की, “आज तू विजय सिंह देओल म्हणून, बॉबी देओल म्हणून की इंटरनेटचा ‘लॉर्ड बॉबी’ म्हणून या शोमध्ये आलास?” यावर बॉबी हसत उत्तर देतो, “मी फक्त धर्मेंद्र यांचा मुलगा म्हणून इथे आलोय.” त्याच्या या एका उत्तरातून वडिलांप्रती असलेलं प्रेम आणि अभिमान स्पष्ट दिसून येतो.

‘शेखर टुनाइट’ या शोची मूळ संकल्पना त्यांचा मुलगा आणि अभिनेता अध्ययन सुमनची आहे. तर धर्मेश संगानी याचे निर्माते आहेत. हा कार्यक्रम आता फक्त सेलिब्रिटी टॉक शो राहिलेला नाही, तर मनापासून होणाऱ्या संवादांचं एक खास व्यासपीठ बनत आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या उत्स्फूर्त  प्रतिसादानंतर ‘शेखर टुनाइट’ दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता यूट्यूबवर प्रदर्शित होत आहे. बॉबी देओलची ही खास मुलाखत शुक्रवारी 22 मे 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Womens T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी शुभसंकेत!
  • मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
  • मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार, या आमदाराचाही आज पक्षप्रवेश होणार?
  • US-Iran डील सुरु असतानाच सोने आणि चांदीच्या दरात झाली मोठी वाढ, नवे दर काय ?
  • Revati Sule Wedding Photo: रेवती सुळेच्या सासुबाईंना पाहिलंत का? पिंक साडीने वेधले सर्वांचे लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in